
रिपब्लिकन सेना, भंडारा जिल्हा स्तरीय सभा.
शुक्रवार, 12 सितंबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा : - रिपब्लिकन सेना, भंडारा चे सर्व आजी -माजी रिपब्लिकन कार्यकर्ते आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची जिल्हा स्तरीय सभा दिनांक 13/09/2025 ला रोज शनिवार ला ठीक दुपारी 1.00 वा.सर्किट हाऊस भंडारा येथे आयोजित करण्यात येत आहे.
या सभेत पक्ष जिल्हा व तालुका कार्यकारिणी ची निवड करण्यात येईल.तसेच पुढील होणाऱ्या नगरपालिका निवडणूक संबंधित आणि जिल्ह्यातील विविध ज्वलंत प्रश्नावर चर्चा करून पुढील आंदोलनाची व कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात येईल.आजतागायत आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ता निवेदन,मोर्चे, आंदोलने, संघर्ष करण्यात स्वतःचा संपूर्ण आयुष्य घालवून हताश व निराश झालेला आहे. चळवळ टिकवून ठेवण्यासाठी कार्यकर्ताही स्वयं- निर्भर व सक्षम असला पाहिजे.सत्तेत वाटा /हिस्सा मिळाल्याशिवाय हे शक्य नाही. यावर चिंतन व मनन करून पुढील कार्यादिशा ठरविणे आहे.
चळवळीतील सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या सत्ता आकांक्षाची पूर्तता करून चळवळी ला नवीन गती व दिशा मिळविण्यासाठी आपण सर्व सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे. सदर सभेत आंबेडकरी विचारावर आधारित रिपब्लिकन चळवळ पुनर्जिवीत करून, समाजातील शोषित- पीडित व उपेक्षित घटकांना सत्तेत भागीदारी व न्याय, समानता व स्वाभिमान राखून उपरोक्त विषयावर सविस्तर चर्चा व मंथन करून रिपब्लिकन लढ्याला बळकट करण्यासाठी आपले अमूल्य योगदान व सहयोग अपेक्षित आहे.
स्थळ :- सर्किट हाऊस, भंडारा.
दिनांक :- 13/09/2025
वेळ :- दु. 1.00 वा. (शनिवार)
आचल मेश्राम (ज्ये. नेते )
मनोज खोब्रागडे (प्रभारी)
युगान्तर बारसागडे (संघटक)
0 Response to " रिपब्लिकन सेना, भंडारा जिल्हा स्तरीय सभा."
एक टिप्पणी भेजें