अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नरेंद्र मेश्राम यांची नियुक्ती.
बुधवार, 17 सितंबर 2025
Comment
दिगंबर देशभ्रतार
" साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- प्राप्त माहिती अनुसार लाखनी तालुक्यातील ग्राम मचारना येतील सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र मेश्राम यांची नियुक्ती अखिल "भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटना" (संपूर्ण भारत) च्या भंडारा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती "अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटने" चे संस्थापक सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार व "अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटने "चे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी लेखी-पत्र व शाल श्रीफळ देऊन नियुक्ती केलेली आहे. नरेंद्र मेश्राम हे आंबेडकर दिव्यांग सामाजिक चळवळीत सक्रिय कार्यकर्ता असून तालुक्यातील व जिल्ह्यातील लोकांच्या अनेक समस्या शासनापुढे निवारण करण्याचे प्रयत्न करत असतात त्यांनी दिव्यांगाच्या जिल्हा व तालुक्या स्तरावर अनेक कार्यक्रम घेऊन समस्या मार्गी लावण्याचे कार्य केले.
त्यांच्या निवडीचे संपूर्ण जिल्ह्यात होत असून त्यांना निवडीचे पुढच्या वाटचालीसाठी नियुक्तीपत्र देऊन शाल श्रीफळ सत्कार करण्यात आला.
उपस्थितांमध्ये संघटनेचे संस्थापक सचिव समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार, मोहाळी तालुका अध्यक्ष प्रवीण जावळकर, सामाजिक कार्यकर्ता दिलीप बुर्डे, साप्ताहिक जनता की आवाज चे टेलिग्राफर हर्षवर्धन देशभ्रतार, तर सामाजिक कार्यकर्त्या मंजुषा देशभ्रतार,प्रमोद बेलेकर,ज्येष्ठ पत्रकार दिगंबर देशभ्रतार,गोपीचंद डडमल ,प्राजक्ता देशभ्रतार,विजय बर्वे, सतीश जीवतोडे,संघवर्धन देशभ्रतार इतर अनेक संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.
0 Response to "अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नरेंद्र मेश्राम यांची नियुक्ती."
एक टिप्पणी भेजें