लाखांदूर येथे जनता दरबाराचे आयोजन.
सोमवार, 15 सितंबर 2025
 Comment 
नरेंद मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज" 
• विविध विभागा अंतर्गत 11 प्रकरणे दाखल
  भंडारा :- जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री पंकजजी भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार दिनांक 15/09/2025 रोजी सकाळी 10. 00 ते दुपारी 1.00 या वेळेत लाखांदूर तालुक्यातील तहसील कार्यालयात जनता दरबार आयोजित करण्यात आले होते. या दरबाराचे मुख्य उद्दिष्ट नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे तातडीने निराकरण करणे हे होते. सदर जनता दरबारला तहसीलदार लाखांदूर  वैभव पवार, जिल्हा सचिव भाजपा भंडारा प्रमोद प्रधान, जिल्हा महामंत्री भाजपा भंडारा कांचन गहाणे, जिल्हा अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा भाजपा भंडारा दिनेश वासनिक, पंचायत समिती सदस्य मधुर उके, जी. प. सदस्य प्रतीक उईके, सरपंच खैरणा तुळशीदास बुरडे, उपविभागीय अभियंता सा. बा. उप. लाखांदूर गेडाम, विस्तार अधिकारी पं. स. लाखांदूर जयवंत डागरे,, कृषी विभाग, पंचायत समिती, वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद, नगरपंचायत लाखांदूर येथील अधिकारी उपस्थित होते._
       _यावेळी उपस्थित नागरिकांच्या  विविध अडचणी, शासकीय योजनांबाबतच्या अडथळ्यांसह स्थानिक प्रश्न याबाबत चर्चा केली. काही तातडीच्या समस्या तत्काळ सोडविण्यात आल्या. पंचायत समिती लाखांदूर - 3, उपविभागीय अभियंता, सा. बा. (जि. प.) उपविभाग साकोली - 1, ठाणेदार, पोलीस स्टेशन लाखांदूर - 1, ठाणेदार, पोलीस स्टेशन पालांदूर - 1, जिल्हा पनन अधिकारी, भंडारा - 2, जिल्हा नियोजन कार्यालय, भंडारा - 1, कार्यकारी अभियंता ईटीयाडोह कार्यालय अर्जुनी / मो. - 1, जिल्हा निबंधक सहकारी संस्था, भंडारा - 1 असे प्रश्न संबंधित विभागाकडे मार्गदर्शनासह सोपविण्यात आले. जनतेशी थेट संवाद साधण्याची ही उत्तम संधी मिळाली असून अशा उपक्रमांमुळे शासन आणि जनता यांच्यातील नाळ अधिक घट्ट होत आहे._
0 Response to "लाखांदूर येथे जनता दरबाराचे आयोजन."
एक टिप्पणी भेजें