ग्रा. प, व त.मु.समितीचा पुढाकार, अवैध दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार
सोमवार, 15 सितंबर 2025
Comment
• तई /बुज. गावातील अवैध दारू विक्री बंद होणार का?
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
लाखांदूर: - लाखांदूर तालुक्यातील तई/बुज. येथे मागील कित्येक वर्षांपासून अवैध दारू विक्रीचा व्यवसाय जोरात सुरु आहे. त्यामुळे गावातील शांतता व सुव्यवस्था भंग झाली असून या अवैध दारू विक्रीमुळे अनेक जण दारूच्या आहारी गेले असून कित्येकांचे संसार उध्वस्त झाले आहे. सदर अवैध दारू विक्रीच्या गटारगंगेमुळे दारू विक्रेते मालामाल झाल्याने या अवैध दारू विक्रेत्यांची गावात दादागिरी सुरु आहे. सदर दारू विक्री बंद व्हावी म्हणून ग्रामपंचायत प्रशासन, तंटामुक्ती समिती, व गावातील महिला यांनी दारू बंदीचा एल्गार पुकारला असून तसे निवेदन पोलीस अधीक्षक भंडारा, पोलीस स्टेशन पालांदूर यांना दि. 11 सप्टेंबर रोजी दिले आहे.
लाखांदूर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर तई/बुज. हे गाव आहे. हे गाव पोलीस स्टेशन पालांदूर अंतर्गत येत असून मागील कित्याक वर्षांपासून येथे 7 ते 8 अवैध दारू विक्रेत्या मार्फत खुलेआम रात्र न दिवस दारू विकली जाते. येथे रोजच परिसरातील दारुड्याची गर्दी असतें. त्यामुळे अनेक जण या व्यसनाच्या आहारी गेल्याने कित्येक लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. तर घरा घरात कलह निर्माण होत आहेत. त्यामुळे गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली आहे.या संबंधाने ग्रामस्थांनी अनेकदा पोलीस विभागाला माहिती दिली. मात्र दाम करी काम या उक्ती प्रमाणे होत असल्याने कार्यवाही शुन्य असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित विभागाला देण देतो.कितीही तक्रारी करा आमचा कुणीही काही वाकड करू शकत नाही. अशी ग्रामस्थांना दारू विक्रेत्या कडून खुलेआम बोलल्या जाते. गावातील दारू बंदी व्हावी म्हणून ग्रामपंचायत समिती, तंटामुक्ती समिती,यांनी दि 4 सप्टेंबर रोजी ग्रामसभेत ठराव पारित केला असून दि 15सप्टेंबर पासून गावात कायम स्वरूपी दारू बंदी करण्यात यावी. म्हणून महिलांनी एल्गार पुकारला आहे. तशाप्रकारचे निवेदन पोलीस अधीक्षक भंडारा, पोलीस स्टेशन पालांदूर यांना दिले आहेत. निवेदन देतेवेळी सरपंच श्रीहरी भेंडारकर, उपसरपंच मोरेश्वर नान्हे, तंटामुक्ती अध्यक्ष सुनीता धकाते, पोलीस पाटील, ग्रा. प. सदस्य व यासह महिला उपस्थित होत्या.
0 Response to "ग्रा. प, व त.मु.समितीचा पुढाकार, अवैध दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार "
एक टिप्पणी भेजें