तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू !
शनिवार, 13 सितंबर 2025
Comment
पालांदूर येथील घटना, घरासमोरच्या तलावातच बुडून मृत्यू
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
पालांदूर :- घरासमोरील तलावाच्या खोल पाण्यात तळ्याच्या(तलावाच्या) पाळीवरून तोल जाऊन तलावाच्या खोल पाण्यात पडून पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. कृष्णा रामाजी नंदनवार (५४) राहणार कोलबास्वामी चौक पालांदूर तालुका लाखनी असे त्याचे नाव आहे. ही घटना शनिवारला (१३ सप्टेंबर) सकाळी १०:३० च्या दरम्यान उघडकीस आली.
घटनेची माहिती मृतकाचा मुलगा फिर्यादी शंकर नंदनवार यांनी पालांदूर पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. यावेळी गावकऱ्यांची मोठी गर्दी घटनास्थळावर होती. पार्थिव पाण्याबाहेर काढून पंचनामा करीत उत्तरीय तपासणी करून कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले. तपास पोउपनी विजय हेमने करीत आहेत. पार्थिवावर अंत्यविधी आटोपली.
फोटो:
0 Response to "तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू ! "
एक टिप्पणी भेजें