सौंदड येथील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
बुधवार, 3 सितंबर 2025
Comment
• बाल तरुण गणेश मंडळ सौंदड व शासकीय आरोग्य उपकेंद्र खोडशिवणी यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीराचे आयोजन
नरेंद्र मेश्राम
"सापताहीक जनता की आवाज"
सौंदड : - गांधी,आंबेडकर वार्ड सौंदड येथील बाल तरुण गणेश मंडळ व शासकीय आरोग्य उपकेंद्र खोडशिवणी च्या संयुक्त विद्यमाने सौंदड येथील ग्रामस्थांनसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शंभरहून अधिक ग्रामस्थांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
डॉ. पृथ्वीराज वैद्यकीय अधिकारी शासकीय आरोग्य उपकेंद्र खोडशिवणी यांनी आरोग्य तपासणी केली. यावेळी त्यांच्या साथीला लंजे सिस्टर, मंदाबाई शिवणकर आशा वर्कर या उपस्थित होत्या
शिबिरात निःशुल्क तपासणी करुन औषधी वाटप करण्यात आली.
प्रारंभी डॉ. पृथ्वीराज व मंडळाचे अध्यक्ष लखन नेवारे यांनी गणेशजी च्या मुर्तीचे पुजन करुन माल्यार्पण केले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन रोहित चांदेवार, नाना नेवारे, मंगेश इरले, लोकेश डोंगरवार, हितेश शाहारे, तुकाराम डोंगरवार, प्रदिप जांभुळकर, नरेंद्र भेंडारकर, प्रविण बिश्वास, मधुकर इरले, मनिष चांदेवार, बापु भेंडारकर, निशोद साखरे आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Response to "सौंदड येथील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद"
एक टिप्पणी भेजें