-->

Happy Diwali

Happy Diwali
वारंवार पाऊसाच्या धारा, फुलोऱ्यावरील धानपीक संकटात!

वारंवार पाऊसाच्या धारा, फुलोऱ्यावरील धानपीक संकटात!


  पुन्हा सात दिवस पावसाचे! 
   शेतकऱ्यांवर अस्मानी संकट! 

"साप्ताहिक जनता की आवाज" 
वूत्त प्रतिनिधी 

भंडारा: - आठवडाभरा पासून तालुक्यातच नव्हे तर जिल्हात सुद्धा दररोज कमी जास्त प्रमाणात पावसाच्या धारा धो धो बरसत आहेत. काही ठिकाणी तर विजांच्या कडकडाट व वादळ वाऱ्यासह पावसाची हजेरी जोरदार हजेरी लागत आहे. अशा या रोजच्या बरसणाऱ्या पावसामुळे फुलोऱ्यावरील धानपीक संकटात सापडले आहे. सततच्या पडणाऱ्या पाउस व वादळामुळे धानाचा फुलोरा खाली पडत असून धान पिकाच्या लोंबीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. धान उत्पादक शेतकऱ्यावर पुन्हा अस्मानी संकट डेरे दाखल झाले असून पुढील सात दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. 
भंडारा जिल्हा हा धान उत्पादक असल्याने खरीप हंगामात मोठया प्रमाणात धानपिकाची लागवड करण्यात येते. जुलैपासून पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने हंगाम सुद्धा समाधानकारक आहे. हलके ते मध्यम वाणाचे धानपीक सध्या स्थितीत फुलोरा अवस्थेत आहेत. अश्या अवस्थेत मोकळे वातावरण गरजेचे असताना रोजच पावसाची दमदार हजेरी लागत असल्याने उत्पादनात घट येण्याची चिन्हे दिसुन येत आहेत. 


बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव...

रोजच्या दिवस रात्रीच्या पावसामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव धान पिकाच्या लोंबीवर तयार झाला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर धान कापणीच्या हंगाम येण्याच्या अगोदरच बुरशीजन्य रोगाने धानउत्पादकांची धाकधूक वाढवली आहे. दुधाळ लोंबीवरचा फुलोर झडत असल्याने लोंबी पूर्णपणे भरण्याची शक्यता कमी आहे. तर काही ठिकाणी लोंबी काळया व लालसर येत आहेत. 
परतीच्या मान्सून १७ सप्टेंबर पासून सुरू होणार असून १८ ऑक्टोंबर पर्यंत परतणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानी व्यक्त केला आहे. विशेषता विदर्भात परतीच्या मान्सूनचा फटका अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हलके ते मध्यम धानाची कापणी, व मळणी सुद्धा संकटात येणार असल्याने धान उत्पादक शेतकऱ्याची धाकधूक वाढली आहे.

0 Response to "वारंवार पाऊसाच्या धारा, फुलोऱ्यावरील धानपीक संकटात!"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article