समर्थ महाविद्यालय लाखनी येथे जागतिक ओझोन दिन साजरा.
मंगलवार, 23 सितंबर 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी
लाखनी :- राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखनी द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय लाखनी येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिगंबर कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली 20 सप्टेंबर 2025 जागतिक ओझोन दिन रोज शनिवारला घेण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख अतिथी महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रमुख डॉ. गभणे आणि विज्ञान शाखेचे प्रमुख डॉ.पर्वते उपस्थित होते पर्यावरण संतुलन टिकवण्यासाठी ओझोनचे जतन करणे ओझोन टिकविण्यासाठी वृक्ष लागवड करणे व प्रदूषण मुक्त वातावरण तयार करणे. जगभरातील अनेक देशांनी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल या करारावर स्वाक्षरी केल्या होत्या त्यामुळे संयुक्त राष्ट्र महासभेने 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन डे म्हणून घोषित केला होता ओझोन थर हा वातावरणाच्या एक महत्त्वाचा भाग आहे आणि हा थर सूर्यापासून येणाऱ्या अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून आपले संरक्षण करतो या थराला होणारे नुकसान पृथ्वीवरील जीवसृष्टीला धोकादायक आहेत. त्याचबरोबर युनायटेड नेशन एनवोर्मेंटल प्रोग्रॅम ने 2025 ची थीम विज्ञानापासून जागतिक कृतीपर्यंत आपले ज्ञान कसे वास्तविक बदल घडून आणू शकते ही प्रतिबिंबित करते की त्या क्षणाची आठवण करून देते जेव्हा शासनाने पहिल्यांदा जगाला ओझोनच्या ऱ्हासाबद्दल इशारा दिला होता त्यामुळे राष्ट्रांना मॉन्टेरियल प्रोटोकॉलसारख्या ऐतिहासिक करारा अंतर्गत एकत्र येण्यास मदत झाली होती . या संयुक्त प्रयत्नांमुळे आधीच हानीकारक रसायने कमी झाली आहे झाली आहेत आणि निरोगी आकाशाची आशा निर्माण झाली आहे. ही थीम हे देखील दर्शवते की विज्ञान अजूनही ओझोन पुनर्प्राप्ती आणि हवामान बदलांच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपले मार्गदर्शन करते हे एकत्र आठवण करून देते की जेव्हा जग एकत्र काम करते तेव्हा आपण खरोखर आपल्या ग्रहाची संरक्षण करू शकतो असे प्रतिपादन भूगोल विभागाच्या प्रा. स्वाती नवले यांनी प्रतिपादन केले त्याचबरोबर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
0 Response to "समर्थ महाविद्यालय लाखनी येथे जागतिक ओझोन दिन साजरा."
एक टिप्पणी भेजें