पोलीस मित्र संघटनेचे ठाणे जिल्हा महिला उपाध्यक्ष समजसेविका सौ.उज्वला किरण पवार यांना अयोध्या येथे अंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
शुक्रवार, 19 सितंबर 2025
Comment
राष्ट्रीय रक्तदान महोत्सव व राष्ट्रीय सेवा रत्न सन्मान समारोह-2025 अयोध्या धाम येथे संपन्न.
सोनू संजीव क्षेत्रे
"साप्ताहिक जनता की आवाज"
कल्याण :- पोलीस मित्र संघटनेचे ठाणे जिल्हा महिला उपाध्यक्ष समाजसेविका सौ उज्वला किरण पवार यांना रामकृष्ण सेवा फाऊंडेशन अयोध्या आयोजित आंतरराष्ट्रीय सेवा सन्मान समारोह 2025 निमंत्रित करून देश भरातून आलेल्या सर्व सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केलेल्या समाज सेवकांना आणि समजसेवी संस्थेला 14.09.2025 रोजी एच.आर.पॅलेस, पेपर मिल दर्शन नगर अयोध्या येथे अंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
ह्या मध्ये समाजसेविका सौ.उज्वला किरण पवार यांना महाराष्ट्राचे मान गर्वाने उंचविण्याचे भाग्य लाभले ह्या सन्मान समारंभ मध्ये त्या करत असलेल्या अनाथ मुलांचे सेवा, रक्तदान व सामाजिक कार्याबद्दल तसेच 33 वे रक्तदान त्यांनी प्रभू रामचंद्र चे पावन भूमी अयोध्या मध्ये केल्या बद्दल नुकतेच अयोध्या येथील भव्य कार्यक्रमामध्ये भाजपाचे विधायक वेद प्रकाश गुप्ता, महापौर गिरीशपती त्रिपाठी श्रीमती रोली सिंह ह्यांचा उपस्थित मध्ये जोधपूर चे महाराणी यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय सेवा रत्न पुरस्कार 2025 सन्मान पत्र आणि स्मृतिचिन्ह देवून समाजसेविका उज्वला किरण पवार यांचा सन्मान करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच मुस्कान मानवसेवा समिती उज्जैन चे अध्यक्ष श्री रईस खान ह्यांचा हस्ते सुध्दा ऑपरेशन सिंदूर अवॉर्ड 2025 ने सन्मानित करण्यात आले.
0 Response to "पोलीस मित्र संघटनेचे ठाणे जिल्हा महिला उपाध्यक्ष समजसेविका सौ.उज्वला किरण पवार यांना अयोध्या येथे अंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले "
एक टिप्पणी भेजें