उल्हासनगर ४ येथिल पोस्ट ऑफिस मधे सांडपाणी जमा होत असल्याची बातमी लागली असताना वरिष्ठ अधिकाऱ्याकडून दाखल..!
शुक्रवार, 19 सितंबर 2025
Comment
सोनू संजीव क्षेत्रे
"साप्ताहिक जनता की आवाज"
उल्हासनगर :- समाजसेवक ॲड प्रशांत चंदनशिव यांनी उल्हासनगर ०४ येथील पोस्ट ऑफिस इमारतीतील तळ मजल्यावर सांडपाणी जमा होत असल्याची तक्रार केली होती व प्रसार माध्यमांना माहिती मिळाली होती या तक्रारीला यश मिळाले असून वरिष्ठ अधिकारी वर्गाने दाखल घेतली आणि पोस्ट ऑफिस उल्हासनगर -४ च्या पोस्ट मास्तरांनी या विषयावर सदर वरिष्ठ कार्यालास कळविले होते.त्यानुसार संबंधित ईमारतील तळमजला दुरुस्तीची विनंती करण्यात आली होती . परंतु या संदर्भात योग्य सहकार्य मिळाले नसून,वरिष्ठ अधिकारी ( Navi Mumbai Region ) यांना तातडीने कळविण्यात आले आणि उल्हासनगर -४ येथील पोस्ट ऑफिस स्थलांतरित करण्याबाबत मंजुरीसाठी पत्रव्यवहार करण्यात आले. ॲड प्रशांत चंदनशिव यांनी अधिकारी वर्गाचे आभार मानले असून सामान्य नागरीकांचे हाल होणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे आवाहन केले आहे आणि नवीन पोस्ट ऑफिस पत्ता: ग्राउंड फ्लोर, विनिशा व्हिला, बीएसएनएल टेलिफोन एक्सचेंज जवळ, मॅनेरा गाव रोड, उल्हसनगर - 421 004.
0 Response to "उल्हासनगर ४ येथिल पोस्ट ऑफिस मधे सांडपाणी जमा होत असल्याची बातमी लागली असताना वरिष्ठ अधिकाऱ्याकडून दाखल..! "
एक टिप्पणी भेजें