डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला मानव मुक्तीचा नवा मार्ग – प्राचार्य राहुल डोंगरे( धम्मचक्र प्रवर्तन दिनी लुम्बिनी बुद्ध विहारात प्रतिपादन)
गुरुवार, 2 अक्टूबर 2025
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- धम्मचक्र प्रवर्तन दिन व विजयादशमी निमित्ताने स्थानिक लुंबिनी बुद्ध बुद्ध विहार येथे ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राचार्य राहुल डोंगरे होते. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक राजूभाऊ चामट तर प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार संजीव भांबोरे व राधेश्याम तिरपुडे हे उपस्थित होते.
प्राचार्य राहुल डोंगरे आपल्या भाषणात म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे मुके बोलू लागले, आंधळे पाहू लागले आणि लंगडे धावू लागले.महाडच्या चवदार तळ्यातून बाबासाहेबांनी समानतेची बीजे रोवली तर काळाराम मंदिर प्रवेशातून सामाजिक हक्काची जाणीव करून दिली. १४ ऑक्टोबर १९५६ नंतर समाजात मोठे सांस्कृतिक परिवर्तन झाले. अनेक आयएएस-आयपीएस तयार झाले, भारतीय समाजाने गावकुसाबाहेर पडून प्रगतीचा मार्ग स्वीकारला आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून राष्ट्राच्या उभारणीत योगदान देऊ लागला.”
ते पुढे म्हणाले की, “न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्वे बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या माध्यमातून समाजाला बहाल केली. त्यांनी भगवान बुद्ध, संत कबीर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांना गुरु मानून पुरोगामी विचारांची पेरणी केली. ‘माझं कुटुंब म्हणजे भारत देश, मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीय’ आहे. प्रत्येकानी ,ज्यांच्याकडे बुद्धी आहे त्यांनी समाजाला बुद्धी द्यावी, ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा,ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी दान द्यावे आणि प्रत्येकानी चिकित्सक विचार पेरून आणि अंगीकार करून बाबासाहेबांचे प्रबुद्ध भारताचे स्वप्न साकार होईल.”खऱ्या अर्थाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मानव मुक्तीचा नवा मार्ग दिला. या भारतावर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अनंत उपकार असल्याचे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाला लुंबिनी धम्म बोधी संस्थेचे अध्यक्ष राधेश्यामजी तिरपुडे, सहसचिव अरुण रामटेके, कोषाध्यक्ष पृथ्वीराज मेश्राम, अशोक लाडे, सोपान शेंडे, निरंजन गजभिये, तसेच सम्यक महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रणिता मेश्राम, उपाध्यक्षा बबिता कांबळे, सचिव नादिरा रामटेके, सुधाताई चौरे, अनु गजभिये, जोशना गावंडे, सुरेखा गजभिये व इंदिरा तिरपुडे, ज्योत्स्ना गावंडे, सुरेखा गजभिये यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराना मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन बबिता कांबळे यांनी केले.प्रास्तविक सुधा चवरे यांनी केले.आभार सुरेखा गजभिये यांनी मानले.
0 Response to "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला मानव मुक्तीचा नवा मार्ग – प्राचार्य राहुल डोंगरे( धम्मचक्र प्रवर्तन दिनी लुम्बिनी बुद्ध विहारात प्रतिपादन)"
एक टिप्पणी भेजें