-->

Happy Diwali

Happy Diwali
ड्रॅगन पॅलेसमध्ये बनतेय भारतीय संविधानाचे मोठे पुस्तक.

ड्रॅगन पॅलेसमध्ये बनतेय भारतीय संविधानाचे मोठे पुस्तक.


"साप्ताहिक जनता की आवाज" 
 वृत्त प्रतिनिधी 

नागपूर :- ओगावा सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष अॅड. सुलेखा कुंभारे व मनीष पाटील काऊंडेशनचे अध्यक्ष मनीष पाटील यांच्या संकल्पनेतून बर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद घेतल्या जाईल, अशी भारतीय संविधानाच्या पुस्तकाची निर्मिती कामठी येथील ड्रॅगन लेसमध्ये होणार आहे. या पुस्तकाची लांबी २९,५ कुट, रुंदी २१.५ फूट असून, २५१ पानांच्या या स्तकांचे वजन १७०० किलो राहणार आहे. सध्या निज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये संयुक्त अरब मिरातमध्ये शाहीद ग्रुप ऑफ कंपनीने बनविलेल्या गैस द प्रोफेट मोहम्मद या भव्य पुस्तकांची नोंद आहे. पुस्तकाची लांबी १६.४० फूट, रुंदी २६.४४ फूट वजन १५०० किलो आहे.

वर्ल्ड रेकार्डची तयारी

ड्रॅगन पॅलेसमध्ये निर्माण होणारी भारतीय संविधानाची सर्वात मोठी पुस्तक ही जगात ऐतिहासिक ठरणार आहे. भारतीय संविधानाच्या ऐतिहासिक पुस्तकाच्या निर्मितीची पायाभरणी २ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ड्रॅगन पॅलेस येथे झाली. यावेळी केंद्रीय

सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, अॅड. सुलेखा कुंभारे, मनीष पाटील, भगवान लोणारे, सतीश अलोणे अलका वाघमारे आणि वामन सोमकुवर उपस्थित होते. या पुस्तकाची निर्मिती १४ एप्रिल २०२६, पर्याव पूर्ण होणार असून पुस्तकातील एक पान पलटविण्यासाठी ८ मानसांची गरज भासणार आहे. या पुस्तकाच्या निर्मितीचा उद्देश म्हणजे सर्वांपर्यंत संविधान पोहचले पाहिजे आणि सर्वांना संविधानाची माहिती झाली पाहिजे, असे मनीष पाटील यांनी सांगितले.

0 Response to "ड्रॅगन पॅलेसमध्ये बनतेय भारतीय संविधानाचे मोठे पुस्तक."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article