बँक प्रशासनाचे दुर्लक्षः नागरिक त्रस्त.व्यावस्थापका कडून टाळाटाळ.
सोमवार, 13 अक्टूबर 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी
तुमसर :- भारतीय स्टेट बैंक शाखा गोबरवाही येथे गेल्या काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांची तीव्र कमतरता निर्माण झाली असून, त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. बँकेतील कामकाज अत्यंत संथ गतीने सुरू असून, दैनंदिन आर्थिक व्यवहार, कर्जवाटप व खात्यांशी संबंधित कामांसाठी ग्राहकांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागत आहे.
येथील नागरिक आर्थिक व्यवहारासाठी अवलंबून.
ग्रामीण भागातील बहुसंख्य नागरिक या शाखेवर आर्थिक व्यवहारांसाठी
अवलंबून आहेत. शेती कर्ज, शासकीय अनुदान व पेन्शन व्यवहारांसाठी रोज शेकडो नागरिक शाखेत हजेरी लावतात. मात्र कमी कर्मचारीसंख्येमुळे सर्व व्यवहार वेळेत पूर्ण होत नाहीत. काही वेळा नागरिकांना एकाच कामासाठी दोन ते तीन वेळा शाखेत फेऱ्या माराव्या लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
शाखा व्यवस्थापका कडून टाळाटाळ करण्याचा प्रयत्न.
योग्य मार्गदर्शन मिळत नसून, त्यांना शाखा व्यवस्थापकांकडून ग्राहकांना टाळाटाळ उत्तरं देण्यात येत असल्याचा
आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी बँक प्रशासनाकडे त्वरित कर्मचारीवाढ करून शाखेचे सुरळीत कामकाज सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून, प्रशासनाने या गंभीर मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात समस्येकडे तत्काळ लक्ष द्यावे, अशी आली आहे.
0 Response to "बँक प्रशासनाचे दुर्लक्षः नागरिक त्रस्त.व्यावस्थापका कडून टाळाटाळ."
एक टिप्पणी भेजें