महिला वाहकाची प्रवाशाला धक्काबुक्की लाखनी बसस्थानकावरील घटना.
सोमवार, 13 अक्टूबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम "
साप्ताहिक जनता की आवाज"
लाखनी :- सुटे पैसे देण्यावरून झालेला वाद विकोपाला जावून प्रकरण हातघाईवर आले. यात एका महिला वाहकाने चक्क पुरुष प्रवाशाला धक्काबुक्की केली. लाखनी स्थानकावर घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ प्रवाशांनी कॅमेऱ्यात कैद केला. तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
प्राप्त माहितीनुसार मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या एका प्रवाशासोबत महिला वाहकाचा तिकिटाच्या सुट्या पैशावरून वाद झाला. शाब्दीक वाद वाढत असताना महिला वाहकाने आपले नियंत्रण गमावत चक्क प्रवाशावर हाता-बुक्क्यांनी गुद्दे मारले. या घटनेमुळे बसस्थानकावर
आठवड्यातील दुसरी घटना
महिला वाहकाकडून प्रवाशाच्या अंगावर धावून जाण्याची ही दुसरी घटना आहे. आठ दिवसांपूर्वी करचखेडा येथे एका महिला वाहकाने विद्यार्थिनीचे केस ओढले होते. अशा प्रकारच्या वर्तनामुळे परिवहन विभागाची प्रतिमा डागळली जात आहे. दरम्यान अद्याप परिवहन विभाग किंवा स्थानिक पोलिसांकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. याप्रकरणी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उपस्थित इतर प्रवाशांमध्ये खळबळ काहींनी ही घटना उडाली.
0 Response to "महिला वाहकाची प्रवाशाला धक्काबुक्की लाखनी बसस्थानकावरील घटना."
एक टिप्पणी भेजें