औषधी दुकानामधून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कफ सिरप खरेदी करू नये : अन्न व औषध प्रशासन.
शनिवार, 11 अक्टूबर 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी.
भंडारा :- दि. 10 ऑक्टोबर :- नागरिकांनी, विशेषतः लहान मुलांना खोकला झाल्यावर कफ सिरपची खरेदी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खरेदी करू नये, असे आवाहन सहायक आयुक्त (औषधे) अन्न व औषध प्रशासन , भंडारा यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यामध्ये खोकल्याच्या औषधाचे सेवनामुळे 21 बालकांचा मृत्यू झाल्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याअनुषंगाने आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांचे 3 ऑक्टोबर 2025 व राज्याचे औषध नियंत्रक यांचे 7 ऑक्टोबर 2025 रोजी परिपत्रकानुसार रजिस्टर्ड प्रॅक्ट्रीशनर यांच्या चिठ्ठीवरच औषधांची विक्री करावी अशा सूचना औषध व्यावसायिकांना देण्यात आल्या आहेत. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व नियम 1945 मध्ये सुध्दा औषधांची विक्री नियंत्रित असावी व शेडयूल एच औषधे ही डॉक्टरांच्या चिठ्ठीनुसारच रूग्णांना विक्री करावी, असे कायद्यास अभिप्रेत आहे.
सर्व औषध विक्रेत्यांनी खोकल्याची औषध रजिस्टर्ड प्रॅक्ट्रीशनर डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय करू नये याची दक्षता घेण्यात यावी. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कफ सिरपची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्याविरूध्द औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व त्याखालील नियम 1945 अंतर्गत कारवाई घेण्यात येईल याची त्यांनी नोंद घ्यावी. अशा सूचना श्रीमती शहाणाज ताजी , सहाय्यक आयुक्त (औषध विभाग ) अन्न व औषध प्रशासन , भंडारा यांनी दिल्या आहे..
0 Response to "औषधी दुकानामधून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कफ सिरप खरेदी करू नये : अन्न व औषध प्रशासन."
एक टिप्पणी भेजें