अनुसूचित जाती एससी उपवर्गीकरणाच्या विरोधात.
शनिवार, 18 अक्टूबर 2025
Comment
• लढा अस्तित्वाचा ,आक्रोश मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयावर भंडारा येथे 31 ऑक्टोबरला आयोजन
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- एस सी उपवर्गीकरणाच्या विरोधात आंबेडकरवादी चळवळीची लढा अस्तित्वाचा आक्रोश मोर्चाचे दिनांक शुक्रवार 31 ऑक्टोबर 2025 ला सकाळी 11 वाजता दसरा मैदान, शास्त्री चौक, ते जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. वरील मोर्चाच्या मागण्यांमध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय मागे घेत उपवर्गीकरण करण्यासाठी स्थापित केलेली समिती तात्काळ रद्द करण्यात यावी, संसदेत कायदा करून सर्वोच्च न्यायालयाच्या उपवर्गीकरणाचा निर्णय बदलविण्यात यावा, अनुसूचित जातीत फुट न पाडता या प्रवर्गात शिक्षणाचे महत्त्व निर्माण करण्यासाठी शासनाने धोरणात्मक पाऊल उचलावे, बी टी ऍक्ट 1949 रद्द करून महाबोधी महाविहार बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावे ,सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळवू नये, मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व आर्थिक नुकसान थांबवावे ,संविधानिक संस्था व संविधानिक पदांवर विराजमान मागासवर्गीय समाजातील व्यक्तींचे होणारे अपमान थांबवावे, सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर होणाऱ्या हल्ल्यामागील जातीवादी ताकतीचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व भविष्यातील सर्व निवडणुका ईव्हीएम वर न घेता बायलर पेपर वर घेण्यात यावे, इत्यादी मागण्यांकरिता सदर मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. असे आव्हान भारतीय बौद्ध महाशाखा ,बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ,समता सैनिक दल ,बामसेफ, रिपब्लिकन सेना ,भीम आर्मी ,आझाद समाज पार्टी, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, बहुजन रिपब्लिकन पार्टी ,आरपीआय सर्व गट, पीआरपी ,बुद्ध विहार समन्वय समिती, कास्टाईब कर्मचारी कल्याण महासंघ, बुद्धिस्ट समाज संघर्ष समिती,लाखांदूर , महामाया महिला सामाजिक न्याय संघ, सम्राट अशोक सेना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम, बुद्ध उपासक उपासिका संघ ,भीमशक्ती संघटनेद्वारे करण्यात आले असून या मोर्चात लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन एस सी
उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती भंडारा जिल्ह्याच्या वतीने करण्यात आलेले आहे.
0 Response to "अनुसूचित जाती एससी उपवर्गीकरणाच्या विरोधात. "
एक टिप्पणी भेजें