-->
साकोलीत जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सव.

साकोलीत जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सव.

"साप्ताहिक जनता की आवाज" 
 वृत्त प्रतिनिधी. 

साकोली :- विदर्भ शाहीर कलाकार परिषद करणार नागपूर अंतर्गत जिल्हा भंडारा द्वारा आयोजित ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सव भारत सभागृह राज्या रोड साकोली येथे घेण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक मनीष कापगते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेवक रवी परशुरामकर, धनवंता राऊत, सामाजिक कार्यकर्ते व समाजभूषण डी. जी. रंगारी, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर सपाटे, केंद्रीय कार्याध्यक्ष अलंकार टेंभुर्ण, शीतल नागदेवे, जिल्हाध्यक्ष डॉ. रामनाथ पारधीकर, केंद्रीय कोषाध्यक्ष मिलिंद खोबराकडे, तालुकाध्यक्ष केशव फसाठे, तालुका अध्यक्ष मारुती मेश्राम, ज्योती वाघाये, प्रभाकर लिचडे, वसंता कुभरे,

नाशिक राहुले, अशोक खोमणे, रमेश रामटेके व इतरही मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, जे जुन्या पारंपारिक गोष्टी आहेत. ढाका असेल जात्यावरच्या नृत्य असेल किंवा मुरसाने ते कांडण असेल तर

विविध पद्धतीचे कलाकार कलाकृती दाखवून आपली पारंपरिक संस्कृती टिकवण्याचे काम या कलाकारांच्या माध्यमातून मोठ्या संख्येने होत असते आणि पूर्ण जिल्ह्यातील जिल्ह्याच्या बाहेरील कलाकार चांगल्या पद्धतीने आपले नृत्यकला साजरी करत असतात असे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमात

विदर्भातील नाटक, तमाशा, नौटंकी, गोंधळ, भारुड कलापथक, दंडार, कीर्तन, भजन, गायन, वादक, नकलाकार, नृत्य, शाहिरी पोवाडा, जात्यावरचे गाणे, हरवण्याचे गाणे असे विविध सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यक्रम सदर मेळाव्यात सादर करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामनाथ पारधीकर यांनी केले संचालन मिलिंद खोब्रागडे यांनी केले तर आभार श्रावण विषयी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता कोमल बोंद्रे, रंजना येडे, श्यामलाल लिचडे, रमेश तिडके, रमेश रामटेके, तुलाराम लांजेवार, गोंदिया जिल्हाध्यक्ष वसंता कांबळे, सुधीर लांडे, राहुल लाजेवार, विश्वनाथ जमकाडे देवनांथ पटले, नंदा वाघे, मुरली केशवराव चांदेवार व इतरही कार्यकर्ते याप्रसंगी मेहनत घेतली.

0 Response to "साकोलीत जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सव."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article