-->

Happy Diwali

Happy Diwali
ग्रामपंचायत सदस्या सौ.रजनी टेंभुर्णे यांचे पतीवर बीजीपी सरपंचकडून जीवघेणा हल्ला.

ग्रामपंचायत सदस्या सौ.रजनी टेंभुर्णे यांचे पतीवर बीजीपी सरपंचकडून जीवघेणा हल्ला.


 

• ग्रामपंचायत सदस्या सौ.रजनी टेंभुर्णे यांच्यावर बीजेपी सरपंचाचे पती श्रीराम नागरीकर यांनी जातीवाचक शिवीगाळ करून  आरो प्लांट निकृष्ट कामावरून जीवघेणा हल्ला.  

• मारहाण करताना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- लाखांदूर तालुक्यातील खोलमारा (जुना )येथील गावात दिनांक 19 ऑक्टोबर 2025 ला दुपारी 12.15 दरम्यान हनुमान मंदिर चौकात ग्रामपंचायत मार्फत सुरू असलेले आरो प्लांट च्या  कामाचे पाहणी करण्याकरता ग्रामपंचायत सदस्या सौ.रजनी टेंभुर्णे पतीसह गेले व तेथील हजर असलेले दिवाणजी यास कामाचे इस्टिमेट व जीएसटी बिल मागितले असता आरोपी श्रीराम मोतीराम नागरीकर वय 38 वर्षे, हा त्या ठिकाणी येऊन ग्रामपंचायत सदस्या रजनी दिनेश टेंभुर्णे यास कामाचे इस्टिमेट व जीएसटी बिल विचारणारी कोण? महारीण,! तू कशाला शहाणपण करतेस? असे जातीवाचक बोलला .तेव्हा फिर्यादीचे पती दिनेश टेंभुर्णे हे भांडण सोडविण्यास आले असता आरोपी श्रीराम नागरीकर वय 38  ,डाकराम नागरीकर वय 35  ,चरणदास नागरिकर वय 60,

 सुकराम  नागरीकर वय 44 राहणार सर्व  खोलमारा जुना,यांनी फिर्यादी व तिचे पतीस ढकल ,ढकलून करून मुलाबाळांसह जीवाने मारण्या पिटण्याची धमकी दिली. तसेच आरोपी क्रमांक संदीप शालिकराम कांबळे वय 34 राहणार खोलमारा जुना याने फिर्यादीचे पतीच्या डोक्यावर उजव्या बाजूस विटेने मारून दुखापत केली .प्राथमिक आरोग्य केंद्र दिघोरी येथील वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेले जखमीचे एमएलसी रिपोर्ट वरून ठाणेदार यांच्या आदेशान्वये सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आलेला आहे. आरोपी विरुद्ध 122/2025 कलम 118(1),115(2),352, 351(2),3(5),189(2), भारतीय  न्याय संहिता 2023 सह कलम 3,(1)(एस) अनुसूचित जाती जनजाती अंतर्गत दिघोरी पोलीस ठाणे येथे  आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

0 Response to "ग्रामपंचायत सदस्या सौ.रजनी टेंभुर्णे यांचे पतीवर बीजीपी सरपंचकडून जीवघेणा हल्ला."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article