“कर्जमुक्ती / कर्जमाफी हा शेतकऱ्यांच्या समस्यावर मूळ उपाय नाही तर उत्पादन खर्चावर आधारित भाव हाच एकमेव शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग आहे.”-- दिपक इंगळे.
शुक्रवार, 17 अक्टूबर 2025
Comment
संकलन संग्रहक
अभय डि.रंगारी दिगंबर एस.देशभ्रतार
कार्यकर्ता जेष्ठ पत्रकार
भंडारा: - कर्जमुक्ती केल्याने शेतकऱ्यांच्या समस्या सुटणार असत्या तर आतापर्यंत तीन वेळा कर्जमाफी झालेली आहे.
२००९ ला देश स्तरावर, २०१७, २०२० ला राज्यात .
हे जवळपास एक लाख कोटी रुपयांच्या आसपास कर्जमुक्तीचे आकडे आहेत.
तीन वेळा कर्जमाफी करूनही , मग का नाही शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या?
शेतकरी परत कर्जबाजारी का झाले?
कर्जबाजारी हा परिणाम आहे, याचे कारण आहे उत्पादन खर्चावर आधारित भाव न मिळणे.
कारण आणि परिणामाचा हा शास्त्रीय सिद्धांत आपण समजून घेतला पाहिजे.
कारणावर काम न करता परिणामांवर काम करणे म्हणजे शहाणपणा नसून दिशाभूल होण्याचा/ करण्याचा कार्यक्रम आहे.
फक्त श्रेय घेण्याचा कार्यक्रम वाटतो बाकी काही नाही.
खरीप हंगाम २०२४- २५ मधे महाराष्ट्रात एकूण सोयाबीन उत्पादन झाले ४० लाख टन.
यापैकी ११ लाख टन सोयाबीन महाराष्ट्र शासनाने ४८९२ रु/ क्विंटल दराने खरेदी केले.
उर्वरीत २९ लाख टन सोयाबीन सरासरी ४००० रु/ क्विंटल दराने शेतकऱ्यांना विक्री करावे लागले.
हंगाम २०२४-२५ मधे सोयाबीनचा वास्तव उत्पादन खर्च हा ६०३९ रू/ क्विंटल होता. (महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत आकडेवारीनुसार).
उत्पादन खर्चावर ५०% नफा मिसळल्यास ९०१९ रु/ क्विंटल भाव सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांस अपेक्षित होता.
यानुसार भाव न मिळाल्याने १९,००० कोटी रुपयांचे नुकसान महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे झाले.
आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर एकूण ३५००० कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे सांगितले जाते.
जर उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला असता तर आम्ही केवळ एक वर्षात सगळ कर्ज फेडून खाते नील केले असते.
त्यामुळे उत्पादन खर्चावर आधारित भाव हाच एकमेव शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग आहे.
बाकी मुद्दे सगळे नंतर.
दिपक इंगळे
प्रदेश अध्यक्ष
राष्ट्रीय किसान मोर्चा,महाराष्ट्र
0 Response to "“कर्जमुक्ती / कर्जमाफी हा शेतकऱ्यांच्या समस्यावर मूळ उपाय नाही तर उत्पादन खर्चावर आधारित भाव हाच एकमेव शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग आहे.”-- दिपक इंगळे."
एक टिप्पणी भेजें