गोंदी येथे १६७ जनावरांवर वंधत्व निवारण उपचार.
मंगलवार, 7 अक्टूबर 2025
Comment
वृत्त प्रतिनिधी
• पालांदूर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची मोहीम.
• पशुपालकांचा सक्रिय सहभाग व सहकार्य.
पालांदूर :- पशुपालकांना नवनवीन तांत्रिक घटकांचा अभ्यास देत दुग्धउत्पादनाला चालना देण्याकरिता शासनाकडून विविध उपक्रम वर्षभर राबविले जात आहेत. पालांदूर प्रथम श्रेणी पशुवैद्यकीय दवाखान्या अंतर्गत गोंदी येथे वंधत्व निवारण अभियान राबविण्यात आले. यात १६७ जनावरांना वंधत्व निवारणाचे उपचार देण्यात आले.
पशुपालक हा पारंपारिक पद्धतीने दुग्धव्यवसाय करीत आहे. त्यामुळे त्याच्या दुग्धव्यवसायात व पशुपालनात प्रगती नजरेत भरत नाही. ही समस्या शासन स्तरावरून ओळखत थेट स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत पशुपालकांपर्यंत पोहोचविण्यात आली. त्यावर जिल्हाभर विशेष अभियान राबवीत पशुपालकांना माहिती पूर्वीत जनावरांवर वंधत्व निवारण अनुषंगाने उपचार करण्यात आले.
पशुवंधत्वाची कारणे...
पशुवंधत्वाची कारणे शोधताना शरीरात खनिज व जीवनसत्व यांची कमतरता महत्त्वाचा घटक आहे. गर्भाशयात संक्रमण असल्याने किंवा जनावराचा माज ओळखता न आल्यामुळे जनावरे भाकड राहतात. या भाकड जनावरांवर वेळेत उपचार झाले तर पशुपालकांना मोठे मदत शक्य आहे.
शिबिराचे उद्घाटन गावचे सरपंच गणेश हत्तीमारे, प्रगतशील शेतकरी व पशुपालक बालाराम गिरहेपुंजे यांच्या हस्ते पार पडले. शिबिराकरिता पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर पवन पावडे, उमेश टिचकुले, अर्जुन खंडाईत, कैलास मेंढे यांनी सहर्ष सहकार्य केले.
पशुपालक शेतकऱ्यांनी, भाकड जनावरांची विशेष काळजी घ्यावी. सहकार्य लागल्यास पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क करावा.
डॉक्टर पवन पावडे पशुधन अधिकारी पालांदूर
0 Response to "गोंदी येथे १६७ जनावरांवर वंधत्व निवारण उपचार. "
एक टिप्पणी भेजें