वन्यजीव सप्ताहानिमित्त समर्थ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी फुलपाखरांचे निरीक्षण.
मंगलवार, 7 अक्टूबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
लाखनी :- दि. 7 ऑक्टोबर 2025 स्थानिक समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग व विज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयाच्या बॉटनिकल गार्डनमध्ये विद्यार्थ्यांनी फुलपाखरे व लहान पक्ष्यांचे निरीक्षण केले.
या निरीक्षणादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या फुलपाखरांच्या जाती ओळखल्या. त्यातून त्यांनी पर्यावरणातील जैवविविधतेचे महत्त्व जाणून घेतले. फुलपाखरे ही पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची घटक असल्याचे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे यांनी व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धनाची जाणीव ठेवून पर्यावरण रक्षणाचे संस्कार जोपासण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. भास्कर पर्वते, प्रा. मनीषा मदनकर, प्रा. पूजा नवखरे, प्रा. लालचंद मेश्राम, प्रा. अजिंक्य भांडारकर, तसेच एनएसएस विभाग प्रमुख डॉ. बंडू चौधरी उपस्थित होते.
0 Response to "वन्यजीव सप्ताहानिमित्त समर्थ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी फुलपाखरांचे निरीक्षण."
एक टिप्पणी भेजें