अध्यात्म, राष्ट्रवाद, मानवता आणि देशप्रेम यांचा संगम घालणारे पहिले संत म्हणजेच तुकडोजी महाराज – प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे.
शनिवार, 11 अक्टूबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"सप्ताहिक जनता की आवाज"
लाखनी :- समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त, राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने *"राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संगोष्टी"* या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दिगंबर कापसे, समन्वयक डॉ. धनंजय गभणे, तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. बंडू चौधरी उपस्थित होते.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. दिगंबर कापसे म्हणाले की, *“भारत ही संतांची भूमी आहे. संतांनी अध्यात्माच्या आधारे समाज प्रबोधन केले; मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अध्यात्माबरोबरच राष्ट्रवाद, मानवता आणि देशप्रेमाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला. त्यांच्या भजन-कीर्तन, खंजिरी कीर्तन आणि 'ग्रामगीता' सारख्या साहित्याच्या माध्यमातून त्यांनी समाजातील अस्पृश्यता, अंधश्रद्धा आणि रूढी-परंपरांचा निषेध करत ग्रामविकासाची संकल्पना मांडली. हीच त्यांची वैशिष्ट्यपूर्ण देणगी आहे.”*
संगोष्टीमध्ये प्रा. डॉ. धनंजय गिरेपुजे, प्रा. पायल गोंधळे, प्रा. अजिंक्य भांडारकर, प्रा. शीतल कोमेजवार आणि श्री. संदीप सरय्या यांनी राष्ट्रसंतांच्या विविध पैलूंवर अभ्यासपूर्ण विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन डॉ. धनंजय गभणे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याने प्रभावित होऊन तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी त्यांना "राष्ट्रसंत" या गौरवाने सन्मानित केले होते. त्यांनी जागतिक पातळीवरही एकतेचा आणि शांततेचा संदेश दिला. आजच्या तरुण पिढीने त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
0 Response to "अध्यात्म, राष्ट्रवाद, मानवता आणि देशप्रेम यांचा संगम घालणारे पहिले संत म्हणजेच तुकडोजी महाराज – प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे."
एक टिप्पणी भेजें