अखेर ऊर्जानगर वसाहती मधील एटीएम मशीन झाली सुरू.
शुक्रवार, 17 अक्टूबर 2025
Comment
• राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने सतत करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश.
नरेंद्र मेश्राम "
साप्ताहिक जनता की आवाज"
चंद्रपूर :- चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र वसाहती मधील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया ची एटीएम मशीन अनेक मागील ८ महिन्यांपासून बंद होती.
सदर बँकेत वसाहत व लगतच्या खैरगाव, आंभोरा या भागातील अनेक नागरिकांचे बँक खाते आहे. सदर एटीएम बंद असल्याने नागरिकांना होत असलेल्या अडचणी मुळे यापूर्वी अनेकदा खातेधारकांनी तोंडी व लेखी तक्रार केली परंतु बँक व्यवस्थापनेतर्फे या तक्रारी कडे सतत दुर्लक्ष करण्यात येत होते.
शेवटी दिनांक १८ जुलै २०२५ रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष्याच्या शिष्ठमंडळाने भारतीय स्टेट बँकचे मा. क्षेत्रीय व्यवथापक चंद्रपूर यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले व खातेधारकांना होत असलेली गैरसोय लक्ष्यात आणून देत तात्काळ सदर एटीएम सुरू न केल्यास बँके समोर निदर्शने करणार असल्याचे सांगितले होते.
तेव्हा बँक व्यवस्थापनाने संबंधित विभागाशी चर्चा करीत येत्या १ महिन्यात सदर बंद पडलेले एटीएम मध्ये नवीन मशीन बसवून पुर्ववत एटीएम मशीन उर्जानगर व लगतच्या परिसरातील नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात येणार अशी ग्वाही दिली होती.
त्यानंतर देखील सदर एटीम मशीन सुरू व्हावी यासाठी सतत भारतीय स्टेट बँकचे मा. क्षेत्रीय व्यवथापक चंद्रपूर यांच्याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस वैद्यकीय विभाग जिल्हाध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य पंकज ढेंगारे, ग्रामपंचायत समिती सदस्य अंकित ढेंगारे यांच्या वतीने सतत प्रत्यक्ष भेट देत पाठपुरावा करण्यात आला होता.
0 Response to " अखेर ऊर्जानगर वसाहती मधील एटीएम मशीन झाली सुरू."
एक टिप्पणी भेजें