दिव्यांग पुनर्वसनासाठी राज्यामध्ये एकूण ६४ केंद्रे झाली कार्यान्वित.
रविवार, 5 अक्टूबर 2025
Comment
• पुन्हा लवकरच ट्रॅक्टर पुनर्वसन केंद्र सुरू होणार.
.दिव्यांगांना तांत्रिक कौशल्य प्रशिक्षण,औद्योगिक कर्ज उपलब्ध करून देणार.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त संकलन
पुणे :- राज्यातील दिव्यांग नागरिकांना आधुनिक सोयीसुविधा, रोजगाराच्या संधी आणि आत्मनिर्भरतेकडे नेण्यासाठी राज्य शासनाने राबविलेल्या 'नमो दिव्यांग शक्ती अभियानाला' गती मिळाली आहे. या अभियानाअंतर्गत आत्तापर्यंत एकूण ६४ दिव्यांग पुनर्वसन केंद्रे सुरू झाली आहेत.
लवकरच एकूण ७३ केंद्रांची कार्यान्विती होणार आहे.या माध्यमातून दिव्यांग बांधवांना तांत्रिक प्रशिक्षण, रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधी, तसेच उद्योग प्रशिक्षणाद्वारे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. समाजात दिव्यांगांचे सन्मानाने पुनर्वसन व्हावे, त्यांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी, यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात मुंबई व उपनगरासाठी एक अतिरिक्त केंद्रही असणार आहे. 'नमो दिव्यांग शक्ती अभियान'मुळे दिव्यांग नागरिक केवळ मदतीवर अवलंबून
तांत्रिक कौशल्य प्रशिक्षण औद्योगिक कर्ज व सुविधा देण्यात येणार.
अत्याधुनिक संगणक प्रशिक्षण, रोजगार व स्वयंरोजगारासाठी विविध कार्यक्रम, उद्योग प्रशिक्षणाद्वारे बँक कर्जसुविधा, दैनंदिन जीवन सुलभ करण्यासाठी आधुनिक साधने, आत्मनिर्भरतेकडे नेणारे मार्गदर्शन व सहाय्य. दिव्यांग केंद्र स्थापनेची टप्प्याटप्प्याने प्रगती.
राहणार नाहीत, तर स्वतःच्या पायावर उभे राहून समाजात स्थान निर्माण करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या अभियानामुळे महाराष्ट्र दिव्यांग पुनर्वसनाच्या क्षेत्रात देशातील इतर राज्यांसाठी आदर्श ठरणार, असा दावाही करण्यात येत आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात ३१ पुनर्वसन केंद्रे, दुसऱ्या टप्प्यात ३० जानेवारी २०२५ पर्यंत २९, तिसऱ्या टप्प्यात २८ एप्रिल अखेरपर्यंत ८, आणि ९ मे मध्ये ३ असे आत्तापर्यंत ६१ दिव्यांग पुनर्वसन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यामुळे एकूण ६४ केंद्रे कार्यान्वित झाली आहेत.
0 Response to "दिव्यांग पुनर्वसनासाठी राज्यामध्ये एकूण ६४ केंद्रे झाली कार्यान्वित."
एक टिप्पणी भेजें