नेहरू नगर भोजापूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन समारोह.
रविवार, 5 अक्टूबर 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी
भंडारा :- लोकायत बहुउद्देशीय संस्था, भोजापूर ता. जि. भंडारा च्या वतीने नेहरू नगर भोजापूर येथे ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन समारोह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला देवेंद्र धारगावे, विनोद हूमणे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित केली. यावेळी उपासक व उपासिका यांनी प्रतिमेस अभिवादन करून, सामुहिक बुद्ध वंदना ग्रहण केली.
या कार्यक्रमास प्रा. डॉ. महेशकुमार भैसारे, योगेश मेश्राम, नरेंद्र गणविर, नंदकिशोर भालाधरे, सुरेंद्र मेश्राम, राखी रंगारी, रत्नघोष भालाधरे, वर्षा गणविर, अस्मिता धारगावे, स्नेहलता मडामे, रुपलता गणविर, प्रमोदिनी भालाधरे, सुबोध मेश्राम, शिला मेश्राम, सुशिल रामटेके, यशोदा दहिवले, दिपाली भोरे, भाग्यश्री मेश्राम, पुष्पा मेश्राम, मंगला भोयर, चंदा लांजेवार, रमेश शेंडे सह परिसरातील नागरिक व बौद्ध उपासक व उपासिका प्रामुख्याने उपस्थित होते. आदित्य गणविर, अंश बोरकर, आरूही मडामे, शुभ्रा सोमनाथे, स्वराली भोरे, मंजिरी भोरे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. राहुल भोरे यांनी केले. अल्पोपहार व खीरदाना नंतर कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.
0 Response to "नेहरू नगर भोजापूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन समारोह."
एक टिप्पणी भेजें