अभिजात मराठी सप्ताहांतर्गत भाषा अभ्यास मंडळाची स्थापना.
शनिवार, 11 अक्टूबर 2025
Comment
• समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे उत्साहात कार्यक्रम संपन्न.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी.
लाखनी :- स्थानिक समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे मराठी विभाग, विदर्भ साहित्य संघ (शाखा लाखनी), विवेकानंद वाचनालय, लाखनी तथा झाडीबोली मंडळ, लाखनी यांच्या संयुक्त विद्यमाने “अभिजात मराठी संवर्धन सप्ताह” अंतर्गत भाषा अभ्यास मंडळाच्या स्थापनेचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिगांबर कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. धनंजय गभने होते, तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. संजयकुमार निंबेकर उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून हरिभाऊ मोहतुरे, प्रा. रामभाऊ कोटागले, डॉ. बंडू चौधरी, डॉ. मुक्ता आगाशे आणि प्रा. अजिंक्य भांडारकर यांनी उपस्थिती दर्शविली.
प्रमुख वक्ते प्रा. डॉ. संजयकुमार निंबेकर यांनी आपल्या प्रभावी व्याख्यानातून अभिजात मराठी भाषेला प्राप्त झालेल्या दर्जाबाबत सविस्तर विवेचन केले. त्यांनी सांगितले की, “आजच्या पिढीने मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करून तिच्या लिखित स्वरूपात अभिव्यक्ती करणे ही काळाची गरज आहे.”
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. धनंजय गभने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठी साहित्याच्या समृद्ध वारशाचा उल्लेख करत, “मराठीला अभिजात दर्जा लाभला आहे, आता बोलीभाषांच्या संवर्धनाकडे लक्ष देणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन केले.
या प्रसंगी विदर्भ साहित्य संघ शाखा लाखनीचे अध्यक्ष हरिभाऊ मोहतुरे यांनी आपल्या काव्यवाचनातून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमात भाषा अभ्यास मंडळाच्या नव्याने निवड झालेल्या सदस्य — गर्दीपसिंग गिल, ट्विंकल चानोरे आणि तृप्ती पारधी — यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच अंतर-महाविद्यालयीन निबंध स्पर्धेत गर्दीपसिंग गिल याने द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल त्याचा रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बंडू चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. अजिंक्य भांडारकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. मुक्ता आगाशे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. मिलिंद कांबळे, प्रा. युवराज जांभुळकर, प्रा. रामचंद्र मेश्राम, प्रा. बाळकृष्ण रामटेके, प्रा. नंदकुमार सावरकर, प्रा. कैवल्य गभणे, प्रा. मनीषा मदनकर, डॉ. संगीता हाडगे, प्रा. रूपाली खेडेकर, प्रा. प्रतिभा वंजारी, डॉ. स्मिता गजभिये व प्रा. स्वाती नवले यांचे विशेष सहकार्य लाभले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
0 Response to "अभिजात मराठी सप्ताहांतर्गत भाषा अभ्यास मंडळाची स्थापना."
एक टिप्पणी भेजें