टिळक सार्वजनिक वाचनालय येथे वाचन प्रेरणा दिवस.
रविवार, 19 अक्टूबर 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी
साकोली :- टिळक सार्वजनिक वाचनालय खंडाळा येथे भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. यात वाचक सभासदांनी सहभाग घेतला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वाचनालयाचे अध्यक्ष टोलीराम लांजेवार, कार्यवाह देवेंद्र लांजेवार, सदस्य नत्थुजी मेश्राम, ग्रंथपाल शारदा लांजेवार, लिपिक दिनेश हातझाडे, शिपाई राजेश मेश्राम उपस्थित होते. त्यात महिला वाचक शालू हातझाडे, कमला लांजेवार, वर्षा करंजेकर, संगिता पुस्तोडे, देवयानी पुस्तोडे, सुनिता करंजेकर तसेच सर्व वाचक मुले व मुली उपस्थित होते.
0 Response to "टिळक सार्वजनिक वाचनालय येथे वाचन प्रेरणा दिवस."
एक टिप्पणी भेजें