यवतमाळमध्ये आदिवासी बांधवांचा भव्य मोर्चा: बंजारा व धनगर समाजाला आरक्षण नको, असा ठाम इशारा".
शनिवार, 11 अक्टूबर 2025
Comment
वृत्त प्रतिनिधी
यवतमाळ :- नमस्कार मंडळी यवतमाळमध्ये आज आदिवासी समाजाचा एक भव्य आणि ऐतिहासिक मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा विशेषतः बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळू नये, यासाठी आयोजित केला गेला आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या विविध भागातून आदिवासी बांधव मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. अंदाजे 1 लाखवरून अधिक आदिवासी बांधव या मोर्च्यात सामील झाले होते.
मोर्चाची सुरुवात यवतमाळच्या पोस्टल ग्राउंडवरून झाली. या ठिकाणाहून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पदयात्रा करण्यात आली . या मोर्चाचा मुख्य उद्देश शासनावर दबाव आणणे आणि बंजारा व धनगर समाजांना आदिवासी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळू नये, ह्याबाबत आपली मागणी स्पष्ट करणे हा होता.
मोर्चामध्ये सर्व पक्षीय नेते सहभागी झाले होते. यामध्ये काँग्रेसचे माजी मंत्री वसंत बुरके, काँग्रेसचे शिवाजीराव मोगे, किनवटचे भाजप आमदार, भीमराव केराम आणि भाजपचे आमदार राजू तोडसाम , तसेच आदिवासी कार्यकर्ते दुर्गाप्रसाद घरतकर यांचा समावेश होता. या नेत्यांनी मोर्च्यात उपस्थित आदिवासी बांधवांना पाठिंबा दर्शविला आणि आरक्षणाच्या विरोधात ठाम भूमिका घेण्याचे आवाहन केले.
आदिवासी समाजाचे नेते या मोर्चाच्या माध्यमातून स्पष्ट संदेश देत आहेत की, आदिवासी प्रवर्गात असलेल्या आरक्षणात कोणतीही घुसखोरी सहन केली जाणार नाही. या आंदोलनातून शासनावर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे आणि यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन सादर करण्यात आले.
आजचा हा मोर्चा फक्त यवतमाळसाठीच नव्हे तर संपूर्ण आदिवासी समाजासाठी ऐतिहासिक ठरला. विदर्भ व मराठवाड्यातील आदिवासी समाजाने एकत्र येऊन आपले हक्क सुरक्षित ठेवण्याचा संदेश स्पष्टपणे दिला आहे. हा मोर्चा आदिवासी समाजाच्या एकतेचा, त्यागाचा आणि ठाम संघर्षाचा प्रतीक ठरला आहे.
0 Response to "यवतमाळमध्ये आदिवासी बांधवांचा भव्य मोर्चा: बंजारा व धनगर समाजाला आरक्षण नको, असा ठाम इशारा"."
एक टिप्पणी भेजें