अन्यायावर न्यायाच्या विजया करिता तुम्हा आम्हाला लढावं लागेल!
सोमवार, 6 अक्टूबर 2025
Comment
• अन्यायग्रस्त व्यवस्थेत बदल गरजेचा
• नाना पटोले, पालांदूर येथे दसरा उत्सव.
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
पालांदूर :- भगवान श्रीरामाने रावणाचा वध करीत अन्यायावर विजय मिळवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याच दिवशी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. अशा या दसऱ्याच्या महत्त्वपूर्ण मुहूर्तावर आपल्याला सुद्धा अन्यायाच्या विरोधात पुढे येऊन न्यायाची लढाई तुमच्या सोबतीने लढायची आहे. असे आवाहन नाना पटोले यांनी उपस्थितांना केले.
पालांदूर येथील दसरा उत्सवात मुख्य अतिथी म्हणून त्यांची हजेरी होती. मंचावर कार्यक्रमाचे मार्गदर्शक भरत खंडाईत, जि प सदस्य सरिता कापसे, सरपंच लता कापसे, उपसरपंच पंकज रामटेके, पं स सदस्य योगिता झलके, माजी उपसभापती विजय कापसे, अध्यक्ष योगेश झलके लाखाची तालुका काँग्रेस कमिटी, कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर आशिष गभने, माजी जि प सदस्य बिंदूबाई कोचे, माजी सरपंच वैशाली खंडाईत, माजी उपसरपंच स्वप्निल खंडाईत, तमुंस अध्यक्ष प्रकाश तलमले, ईश्वर तलमले व पत्रकार बंधू उपस्थित होते.
दसरा उत्सवात नागरिकांची तोबा गर्दी होती. फटाक्यांची आतषबाजी नेत्रदीपक ठरली. सलग तीन तास संगीत मैफिल सजली. एक से बढकर एक संगीताची मेजवानी उपस्थितांना मनोरंजनाची ठरली. बच्चेकंपनीने नाचण्याचा मनमुराद आनंद लुटला. सायंकाळी ७ वाजे नियोजनानुसार भरत खंडाईत यांच्या हस्ते रावण दहन पार पडले. कार्यक्रमाकरिता दसरा उत्सव समितीच्या युवा कार्यकर्त्यांनी उस्फूर्तपणे सहकार्य केले. सपोनी सुनील बनसोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहतूक व्यवस्था सुसज्जपणे सांभाळली. प्रस्तावना व आभार कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर आशिष गभने यांनी सांभाळले.
0 Response to "अन्यायावर न्यायाच्या विजया करिता तुम्हा आम्हाला लढावं लागेल! "
एक टिप्पणी भेजें