गोंदिया जिल्हा पोलीस वार्तापत्र ( कायदेशीर व्यवस्था.)
शनिवार, 4 अक्टूबर 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज "
वृत्त प्रतिनिधी.
गोदिया :- दि.०६/१०/२०२५ रोजी आदिवासी आरक्षण बचाव कृती समीती गोंदिया जिल्हा तर्फे भव्य मोर्चा-आंदोलन करण्यात येणार आहे. सदर आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने लोकांचे सहभाग होण्याची संभावना आहे.
सदर आंदोलन जयस्तंभ चौक ते मा. जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया या मार्गावर असल्याने सामान्य जनतेला धोका, गैरसोय किंवा अडथळा निर्माण होवु नये, म्हणुन मा. जिल्हाधिकारी सा. गोंदिया यांचे कार्यालयीन जावक क्रमांक जिकागों/स.म.अ./दंड/कावि-५४६/२०२५ दि.०४/१०/२०२५ अन्वये मा. जिल्हाधिकारी सा. गोंदिया यांनी वाहतुकीचे आवागमन पर्यायी मार्गाने वळविण्याची अधिसुचना निर्गमित केलेली आहे.
सदर अधिसुचनेप्रमाणे वरील पार्श्वभुमी लक्षात घेता आयोजीत मोर्चा-आंदोलन दरम्यान जयस्तंभ चौक ते पतंगा चौक पर्यंत मुख्य मार्गावर वाहतुकीची कोंडी होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये, याकरीता -
१) जयस्तंभ चौक ते फुलचुर नाकापर्यंत जाणाऱ्या वाहीनीतुन सकाळी ०९:०० वा. ते सायंकाळी ०६:०० वा. पर्यंत वाहतुकीसाठी बंद राहिल.
पर्यायी मार्ग - सकाळी ०९:०० वा. ते सायंकाळी ०६:०० वा. पर्यंत फुलचुर नाका ते जयस्तंभचौकापर्यत येणारी वाहिनीतुन वाहतुक दुतर्फा वाहतुक खुली राहिल.
२) फुलचुर नाका ते पतंगा चौकापर्यंत सकाळी ०९:०० वा. ते सायंकाळी ०६:०० वा. पर्यंत या मार्गाने येण्या-जाण्यासाठी वाहतुक पुर्णपणे बंद राहिल.
पर्यायी मार्ग- सकाळी ०९:०० वा. ते सायंकाळी ०६:०० वा. पर्यंत पतंगा चौक ते कारंजा टी पाईंट ते फुलचुर नाका हे मार्ग वाहतुकीस पर्यायी मार्ग राहिल.
सदर मोर्चात येणाऱ्या आंदोनकारी लोकांसाठी वाहन पार्किंग ची व्यवस्था खालीलप्रमाणे करण्यात आलेली आहेत.
> आमगावकडुन येणाऱ्या वाहन पतंगा चौकात बंद रोडवर पार्किंग करतील.
➤ बालाघाटकडुन येणारे लोकांसाठी मोदी ग्राउंड व रस्त्याची बंद बाजुवर पार्किंग करतील.
> गोरेगावकडुन येणारे लोकांसाठी कारंजा ते पतंगा बंद रोडवर पार्किंग करतील.
0 Response to "गोंदिया जिल्हा पोलीस वार्तापत्र ( कायदेशीर व्यवस्था.)"
एक टिप्पणी भेजें