सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवरील हल्ला प्रकरणी.
मंगलवार, 7 अक्टूबर 2025
Comment
• पवनी वकील संघाचे वतीने एक दिवसाचा लाक्षणिक संप.
नरेन्द्र मेश्राम
"सापताहीक जनता की आवाज"
भंडारा :- आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयात माथेफिरू प्रवृत्तीच्या एका वकील व्यक्तीने जातीवादी प्रवृत्तीतून केलेला प्रकार हा अत्यंत निंदनीय असून भारताच्या सरन्यायाधीशावर भर न्यायालयात जोडा भिरकावून हल्ला करण्याचा प्रयत्न केला.या घटनेचा बार असोसिएशन पवनी च्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.
आपल्या सन्माननीय सरन्यायाधीशांवर अशा प्रकारचा हल्ला करण्याचा प्रयत्न देशातील कोणताही सुजाण नागरिक खपवून घेणार नाही.न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येऊन व दोषी व्यक्तीच्या विरोधात कारवाई करण्यात येऊन कठोर शिक्षा देण्यात यावी ,अशी मागणी करण्यात आली.
-भारताचे सर न्यायाधीश मा .भूषण गवई यांच्यावर सुनावणीच्या दरम्यान एका जातीयवादी माथेफिरू वकीलाने पायातील जोडा फेकून मारण्याचा प्रयत्न केला.
अशा वकीलाचा व अशा मानसिकतेचा जाहीर निषेध करण्यात आला.तसेच पवनी वकील संघाचे वतीने एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्यात येवून कोर्टात कामकाज केले नाही.
या संपात पवनी वकील संघाचे जेष्ठ विधिज्ञ ॲड महेंद्र गोस्वामी, अध्यक्ष ॲड के एम जिभकाटे, सचिव ॲड कावेरी शेंडे, ॲड दिपक देशमुख, ॲड काटेखाये , ॲड तलमले, ॲड सुखदेवे , ॲड गजभिये, ॲड बनारसे, ॲड कावळे, ॲड सावरकर, ॲड श्रद्धा कामथे, ॲड ऋतुजा अवसरे, ॲड स्नेहल पारधी, ॲड भुरे, ॲड विवेक देशमुख, ॲड बनसोड सह सर्व सन्माननीय वकील संघाचे सदस्य उपस्थित होते.
0 Response to "सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवरील हल्ला प्रकरणी."
एक टिप्पणी भेजें