गोविंद विद्यालय तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय पालांदूर येथे एनसीसी युनिटला प्रारंभ.
मंगलवार, 7 अक्टूबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
पालांदूर :- गोविंद विद्यालय पालांदूर येथे सन 2025-26 पासून एम एच मेड एनसीसी नागपूर कडून नवीन एनसीसी युनिटची मान्यता मिळाली असून एनसीसी विभाग नागपूर कडून 1 ऑक्टोबरला एनसीसी ची भरती प्रक्रिया राबविण्यात आली.
यावेळी महा.मेड.एनसीसी नागपूर कडून सुभेदार राजेश इ, हवालदार मुकेश वाडीभस्मे उपस्थित होते. विद्यार्थ्यांची शारीरिक,बौद्धिक निवड चाचणी घेण्यात आली. निवड प्रक्रियेच्या वेळी एनसीसी मुख्यालय नागपूरकडून मेजर इ राजू तसेच एनसीसी सी जी आय दर्शिका शर्मा यांनी विद्यालयाला भेट दिली. त्यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आनंदराव मदनकर सर यांच्याशी हितगुज केले व नवीन सर्व एनसीसी कॅडेट्सचे अभिनंदन करून एनसीसी चे विविध उपक्रम बाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
भरती प्रक्रिया दरम्यान विद्यालयातील एनसीसी सीटीओ देवेंद्र शेंडे सर, तसेच शारीरिक शिक्षक विनोद शिवरकर सर, पियुष वंजारी सर, संदीप खेडकर सर, कु. दिपाली काशीकर मॅडम,टानसिंग मेश्राम तसेच विद्यालयातील शिक्षक व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
0 Response to "गोविंद विद्यालय तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय पालांदूर येथे एनसीसी युनिटला प्रारंभ."
एक टिप्पणी भेजें