चिखल पाण्यातून शोधावी लागते विद्यार्थ्यांना शाळेची वाट.
सोमवार, 6 अक्टूबर 2025
Comment
• ग्रा. प. चिचाळचा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ.
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक की आवाज"
बारव्हा :- विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी घुटकाभर पाण्यासह चिखलातून वाट शोधावी लागत आहे. ग्रामपंचायत चिचाळ प्रशासनाचा चिमुकल्या विध्यार्थ्यांच्या जीवाशी खिलवाड करीत आहे की काय? अशा प्रश्न उपस्थित होत आहे
लाखांदूर तालुक्यातील चिचाळ ग्रामपंचायत ही कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच प्रकाश झोतात असतें. ग्रामपंचायत प्रशासनाचे महत्वाचे काम म्हणजे गावातील नागरिकांना आरोग्य, पाणी, रस्ते, नाल्या यासह अन्य सोयी सुविधा उपलब्ध करून देणे हे आहे.
त्या उपलब्ध करून देण्यासाठी नागरिकांकडून दर वर्षी कर वसुल सुद्धा करण्यात येते. मात्र याला ही ग्रामपंचायत प्रशासन अपवाद असल्याचे दिसून येत आहे.चिचाळ ग्रामपंचायतमध्ये 3 वार्डाचा समावेश आहे. मात्र या तिन्ही वार्डात सोयी सुविधाचा अभाव असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे. वार्ड क्र 2 टोली मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय आहे. येथे वर्ग 5ते 10 पर्यंत शाळा आहे. मात्र या शाळेत जाण्यासाठी रस्ता नाही. मागील दोनवर्षीपूर्वी शाळेकडे जाण्यासाठी सिमेंट रस्ता बनविण्यात आला.
मात्र तोही अर्धवट बनविण्यात आला. सदर रस्त्यापासून जवळपास 500 मिटर रस्ता हा कच्चा असल्याने या रस्त्यावर नेहमीच पाणी व चिखल साचलेले असतें.अशा या चिखल व गुटकाभर पाण्यातून चिमुकल्या विद्यार्थ्यांना वाट शोधून शाळा गाठावी लागते.या संबंधाने परिसरातील रहिवासी व शाळेने वारंवार रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्याकडे करण्यात आली. मात्र याकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. रोजच चिखल वाटेने विद्यार्थ्यांना मार्गक्रमण करावे लागत अस्सल्याने एखादावेळी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. तरी ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रस्त्यावर मुरूम टाकून डागडुजी करण्याची मागणी विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.
0 Response to "चिखल पाण्यातून शोधावी लागते विद्यार्थ्यांना शाळेची वाट."
एक टिप्पणी भेजें