श्री संताजी महाविद्यालयाची प्रेक्षणीय स्थळांना क्षेत्रीय भेट.
सोमवार, 6 अक्टूबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
पालांदूर(चौ) :- श्री संताजी कला व विज्ञान मधील पालादूर (चौ) येथील विद्यार्थ्यांची नवीन शैक्षणिक धोरणानुसार (2020) क्षेत्रीय भेटीसाठी शैक्षणिक सहल दिनांक 4/10/2025 आयोजित करण्यात आली. सदर सहलीच्या माध्यमातून खिडशी जलाशय, रामटेक मंदिर, नगरधन किल्ला, मध्यवर्ती संग्रहालय नागपूर, संसद भवन, संविधान चौक, झिरो माईस, दीक्षाभूमी,स्वामीनारायण मंदिर इ. प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यात आल्यात. या भेटीच्या माध्यमातून विविध प्रेक्षणीय स्थळांचे बारकाईने निरीक्षण विद्यार्थ्यांना करून देण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती कशी जागृत करता येईल. याचे सखोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना तज्ञ मार्गदर्शका च्या माध्यमातून करण्यात आले. व याच माध्यमातून विद्यार्थ्यांनी क्षेत्रीय संशोधन तयार करावे असे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले. या प्रेक्षणीय स्थळानंतर विद्यार्थ्यांना सुखद आनंददायी मेट्रोचा प्रवास सुद्धा करण्यात आला. सदर सहलीत महाविद्यालयातील डॉ. राजेंद्र खंडाईत, डॉ. रमेश बागडे,डॉ. संजय कुमार निंबेकर,डॉ. नितीन थुल, प्रा. प्रमोद शेंडे, प्रा. मनोज मोहतुरे, प्रा. सेलोकर मॅडम, महेश गुरखे, जया कोडापे, श्री जयदेव ढवळे तसेच महाविद्यालयातील 80 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सदर सहल डॉ. सोमदत्त करंजेकर अध्यक्ष बहुउद्देशीय विकास संस्था नागपूर यांच्या मार्गदर्शनातून व्यवस्थितपणे पार पाडण्यात आली.
0 Response to "श्री संताजी महाविद्यालयाची प्रेक्षणीय स्थळांना क्षेत्रीय भेट."
एक टिप्पणी भेजें