श्री संताजी महाविद्यालयात गीतगायन स्पर्धेचे उत्कृष्टआयोजन.
सोमवार, 13 अक्टूबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
पालांदूर (चौ) :- स्थानिक श्री संताजी कला व विज्ञान महाविद्यालय पालांदूर (चौ) येथे आज दिनांक १३/१०/२०२५ ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता माता सरस्वती, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच विद्यापीठ गीताने करण्यात आली. गीत गायन स्पर्धेचे प्रास्ताविक तसेच पाहुण्यांचा परिचय सांस्कृतिक प्रमुख प्रा. डॉ. रमेश बागडे यांनी केलेत. प्रास्ताविक भाषणातून त्यांनी स्पर्धेचे नियम तसेच गुण कशावर आधारित देता येतील याचे सविस्तर विवेचन केलेत. कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. जी. आर.लांजेवार उपस्थित होते. सदर गीत गायन स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ संजय कुमार निंबेकर, प्राध्यापक प्रमोद शेंडे भूमिका पार पाडली. कार्यक्रम प्रसंगी डॉ.दीपक अंभोरे, डॉ. राजेंद्र खंडाईत, डॉ.नितीन थुल, श्री जयदेव ढवळे प्रा. सेलोकर मॅडम, प्रा. कु. रोहिणी कोचे मॅडम उपस्थित होत्या. या स्पर्धेत महाविद्यालयातील पंधरा स्पर्धकांनी भाग घेऊन उत्कृष्ट अशी देशभक्ती वर आधारित उत्कृष्ट गीते आपल्या सुमधुर आवाजातून गायलीत. सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. प्रियंका खेडीकर, तर द्वितीय क्रमांक कु. वैष्णवी वैकुंठी तर तृतीय क्रमांक कु. साहिली बोरकर इने मिळविला. सदर विद्यार्थ्यांचे अभिनंदन पुष्पगुच्छ देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ. जी. आर. लांजेवार यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन प्रा. मनोज मोहतुरे तर आभार प्रदर्शन डॉ. नितीन थूल यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी कु. निकिता कोडापे, सेजल पराते, योगिता बावणे, खुशबू बागडकर इत्यादी विद्यार्थिनींनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवून स्पर्धेचा आस्वाद घेतला.
0 Response to "श्री संताजी महाविद्यालयात गीतगायन स्पर्धेचे उत्कृष्टआयोजन."
एक टिप्पणी भेजें