आमदार रामदास मसराम यांनी कार्यकर्त्यांसह दिले निवेदन; देसाईगंज तालुक्यात डुप्लिकेट मतदार यादीविरोधात कारवाईची मागणी.
मंगलवार, 14 अक्टूबर 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी
देसाईगंज (वडसा) :- आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदासजी मसराम यांनी कार्यकर्त्यांसह देसाईगंज येथील तहसीलदार व तालुका निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवेदन सादर केले. या निवेदनात त्यांनी देसाईगंज तालुक्यातील डुप्लिकेट मतदार नावांबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आमदार मसराम यांनी नमूद केले की, भारतीय राज्यघटनेनुसार सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला असला तरी काही ठिकाणी डुप्लिकेट मतदार यादी तयार झाल्या आहेत. विशेषतः देसाईगंज तालुक्यातील अनेक मतदारांची नावे दोन ठिकाणी नोंद झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मतदार यादीतील डुप्लिकेट नावे तातडीने वगळण्याचे निर्देश देत, आवश्यक ती दुरुस्ती करण्याची मागणी केली. तसेच, जर कारवाई करण्यात आली नाही, तर काँग्रेस कमिटीमार्फत आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आमदार मसराम यांनी दिला.
या वेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम ,माजी सभापती परसरामजी टिकले, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष देसाईगंज राजेंद्र बुल्ले, माजी उपसभापती नितीनजी राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य ममता पेंदाम, कमलेश बारस्कर, नरेंद्र गजपुरे सर्वेश्वर मेश्राम, काँग्रेस कमिटी ओबीसी सेल तालुकाध्यक्ष कैलास वानखेडे,कैलास वानखेडे, काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष देसाईगंज विजय पिल्लेवान, युवक काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष अमर भर्रे, सागर वाढई, विकास प्रधान, कोंढाळा सरपंच अर्पणा राऊत , पिंकू बावणे,दुर्वास नाईक,रजनी आत्राम ,ललिता वालदे, वैष्णवी आकरे, भुवनेश्वर शिंगाडे, दिवाकर कांबळे, वैभव मेश्राम, आकाश शेंडे, राज कुमार मेश्राम, कुणाल सुखारे, सिद्धार्थ गायकवाड, हर्षद मेश्राम, व्यंकट पेंदाम, देवनाथ सयाम, ओमप्रकाश सयाम, गणेश करपते, उपस्थीत होते.
0 Response to "आमदार रामदास मसराम यांनी कार्यकर्त्यांसह दिले निवेदन; देसाईगंज तालुक्यात डुप्लिकेट मतदार यादीविरोधात कारवाईची मागणी."
एक टिप्पणी भेजें