छाननीनंतर 218 नामांकन बाद.
शुक्रवार, 21 नवंबर 2025
Comment
नगरसेवकाच्या रिंगणात 730 अर्ज : नगराध्यक्ष पदाच्या 71 नामांकना पैकी 32 बाद : 39 अर्ज कायम
"साप्ताहिक जनता की आवाज"
वुत्तपत्र प्रतिनिधी
भंडारा :- जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी आणि साकोली या चार नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेले नामांकन मोठ्या प्रमाणावर बाद झाले आहेत नामांकन च्या अर्जामध्ये असणाऱ्या त्रुट्या एबी फॉर्म, न जोडणे प्रमाणपत्र पुरेशी नसणे आधी कारणामुळे अनेकांचे नगरसेवक होण्याचे स्वप्न छाननी मध्येच भंगले गेले. नगराध्यक्ष पदासाठी चारही ठिकाणी ७१ नामांकन आले होते त्यापैकी ३२ अपात्र ठरवल्याने ३९ अर्ज कायम
आहेत तर नगरसेवक पदासाठी आलेल्या ९२५ नामांकनांमधून १९५ अपात्र ठरले त्यामुळे आता ७३० कायम राहिले आहे खरे चित्र २५ तारखेनंतर स्पष्ट होणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या नामांकनात सर्वात बाद होणाऱ्या नामांकनाची संख्या भंडारा आणि साकोलीत आहे तर नगराध्यक्ष पदासाठी सर्वाधिक नामांकने भंडाऱ्यात बाद झाली आहेत त्या पाठोपाठ साकोलीमध्ये हा क्रम आहे. पवनी
नगरपालिकेत अध्यक्ष पदासाठी ११ आणि सदस्य पदासाठी १५१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते त्यापैकी अध्यक्ष पदासाठी ४ आणि सदस्य पदासाठी २८ उमेदवारांची अर्ज रद्द करण्यात आले सध्या अध्यक्ष पदासाठी सात आणि सदस्य पदासाठी १२३ उमेदवार रिंगणात आहेत.
साकोली नगरपालिकेत अध्यक्ष पदासाठी सोडा आणि सदस्य पदासाठी १७१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते त्यापैकी झालेल्या छाननीत अध्यक्षपदासाठी
सहा आणि सदस्य पदासाठी ६० उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यात आले आता अध्यक्ष 'पदासाठी १० आणि सदस्य पदासाठी १११ उमेदवार शिल्लक आहेत.
तुमसर पालिकेत अध्यक्ष पदासाठी १५ उमेदवारांनी २३ अर्ज दाखल केले होते आज छाननी नंतर चार अर्ज रद्द करण्यात आले आता या पदासाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत भंडारा नगरपालिकेत उमेदवारांची संख्या जास्त असल्याने छाननी प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
0 Response to "छाननीनंतर 218 नामांकन बाद."
एक टिप्पणी भेजें