26 नोव्हेंबर रोजी निळी क्रांती संघटनेकडून शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ला येथे संविधान दिवस मोठ्या आनंद उत्सोहत साजरा..
शुक्रवार, 28 नवंबर 2025
Comment
सोनू संजीव क्षेत्रे
"साप्ताहिक जनता की आवाज"
उल्हासनगर :- निळी क्रांती या सामाजिक संघटनेने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संविधान दिवस हा पवित्र स्थळी साजरा करण्याचे प्रतीकात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात असून शिवनेरी किल्ला येथे संविधान प्रस्तावना वाचून मोठया उत्सोहात साजरा करण्यात आला
भारतीय संविधान आपल्याला समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधूता शिकवते व आपले मूलभूत अधिकार बहाल करते व राष्ट्रा विषयी एकात्मता निर्माण करते व त्या ठिकाणीं संविधानाची प्रत वाचली आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य कसे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारतीय संविधानात प्रत्यक्षात उतरवले आणि त्याबद्दल अधिकचे महत्व पटवून दिले. आणि तेथील अनेक ग्रामीण आदिवासी भागातून आलेल्या शाळेतील विद्यार्थी, पर्यटक, लोकांमध्ये संविधान विषयी आपल्या मूलभूत अधिकारांन विषयी जनजागृती करून शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांन सोबत 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस हा साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला उपस्थित निळी क्रांती संघटनेचे पदाधिकारी प्रथमेश बगाडे ,भाऊसाहेब मेश्राम , आशिष चंदनशिव, अक्षय मनवर, श्याम चंदनशिव, प्रफुल पंडागळे, अमित पाढेन, राहूल निराट्टी, आदित्य गुलसुंदरे, यश गायकवाड, सिद्धार्थ भगत, आशिष बगाडे, बुध्दभूषण पाढेन, आकाश लोंढे, विशाल पंडित,इत्यादी पदाधिकारी या ठिकाणीं उपस्थित होते तसेच कार्यक्रम मोठया उत्सोहात पार पाडण्यात आला..
0 Response to "26 नोव्हेंबर रोजी निळी क्रांती संघटनेकडून शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ला येथे संविधान दिवस मोठ्या आनंद उत्सोहत साजरा.. "
एक टिप्पणी भेजें