26 नोव्हेंबर रोजी नॅशनल कौन्सिल फॉर सोशल जस्टीस ची स्थापना चेंबूर मध्ये, संस्थापक अध्यक्ष ॲड.महेंद्र भिंगारदिवे,अधिवक्ता मुंबई उच्च न्यायालय.
शुक्रवार, 28 नवंबर 2025
Comment
सोनू संजीव क्षेत्रे
"साप्ताहिक जनता की आवाज"
मुंबई (चेंबूर) :- 26 नोव्हेंबर, संविधान दिनाचे औचित्य साधून नॅशनल कौन्सिल फॉर सोशल जस्टीस ची स्थापना करण्यात आली. संघटनेचे उद्दिष्ट सामाजिक अन्याया विरुद्ध आवाज उचलून त्यांना न्याय मिळून देणे होय, मग तो कोणत्याही जाती धर्माच्या लोकांवर झालेला असेल त्याची दाखल नॅशनल कौन्सिल फॉर सोशल जस्टीस घेईल. दारू बंदी, जुगार बंदी, नशा बंदी, फूट पाथ अतिक्रमणे, सरकारी जागेचे वर नगरसेवक, आमदार, खासदार ह्याच्या कडून झालेल्या अतिक्रमणे जमिनदोस्त करून मोकळी करून पुन्हा जनतेला मिळून देण्यास कार्य करणे, महिला, बालके ह्यांच्या सक्षमीकरणावर काम करणे, पोलिस ठाण्यातून, सरकारी, SRA कार्यालयातून होणार्या अन्यायकारक असल्याचे वागणुकीची दाखल घेऊन योग्य ती कायदेशीर पाउले उचलून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पर्यंत करणे अणि ईतर असंख्य सामाजिक विषयांवर नॅशनल कैन्सिल फॉर सोशल जस्टीस येणार्या काळात काम करणार आहे.नॅशनल कौन्सिल फॉर सोशल जस्टीस त्यांच्या कार्यकाळात कुठलेही आंदोलन घेणार नाही ज्यामुळे सरकार ला किवा जनतेला वेठीस धरले जाईल, सरकारी मालमत्तेचे नुकसान होणार नाही, आंदोलकांवर गुन्हे दाखल होणार नाही ह्याची विशेषता नॅशनल कौन्सिल फॉर सोशल जस्टीस दखल घेणार आहे, संबंधित सरकारी कार्यालय कडून दिलेल्या वेळेत कामे झाली नाहीत, किवा कामे करण्यासाठी टाळाटाळ केली जात असेल अश्या अधिकाऱ्यांवर, संबंधित कार्यालयाच्या विरोधात लगेच उच्च न्यायालयात राईट पीटिशन फाईल केल्या जातील. सरकारी अधिकारी ह्यांनी त्यांचे कायदेशीर कर्तव्य का नाही केलेत ह्याचे उत्तर त्यांना कोर्टात विचारले जाईल, योग गुन्हे त्यांच्यावर दाखल केले जातील, बेकायदेशीरपणे रुक्षतोडी वर नियंत्रण ठेवण्यासाठी, रुक्ष प्रतिरोपण करण्याकडे जातीने लक्ष दिले जाईल, भ्रष्टाचारावर प्रतिबंध कसा घालता, भ्रष्ट अधिकारी वर गुन्हे दाखल केले जातील, ह्याच्यावर देखील नॅशनल कौन्सिल फॉर सोशल जस्टीस काम करणार आहे अणि ॲट्रॉसिटी सारख्या गंभीर गुन्हावर नॅशनल कॅन्सल फॉर सोशल जस्टीस बारकाईने लक्ष ठेवणार आहे, अत्याचारीत पीडित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठीच नॅशनल कौन्सिल फॉर सोशल जस्टीस ची स्थापना करण्यात आली आहे.सादर उदघाटन प्रसंगी स्वतः ॲड. महेंद्र भिंगारदिवे, संस्थापक अध्यक्ष,नॅशनल कौन्सिल फॉर सोशल जस्टीस, आयु. प्रविण भोसले,मुख्य संपादक निर्भीड दृष्टी पाक्षिक,आयु. सागर शार्दूल, आयु. कैलाश पवार, आयु. कदीर शेख, अणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
ॲड.महेंद्र भिंगारदिवे
संस्थापक अध्यक्ष- नॅशनल कौन्सिल फॉर सोशल जस्टीस
अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय
0 Response to "26 नोव्हेंबर रोजी नॅशनल कौन्सिल फॉर सोशल जस्टीस ची स्थापना चेंबूर मध्ये, संस्थापक अध्यक्ष ॲड.महेंद्र भिंगारदिवे,अधिवक्ता मुंबई उच्च न्यायालय. "
एक टिप्पणी भेजें