-->
एका इसमाचा संशयित मृत्यू..!

एका इसमाचा संशयित मृत्यू..!

लाखांदूर तालुक्यात पंधरवड्यातील तिसरी घटना.

नरेन्द्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

लाखांदूर :- एका 35 वर्षीय इसमाचा संशयित मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना आज 9 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास तालुक्यातील विरली खुर्द येथे उघडकीस आली. बुद्धिमान धनविजय वय 35 वर्षे रा.विरली/खुर्द असे घटनेतील मृत इसमाचे नाव आहे. या घटनेत लाखांदूर पोलिस स्टेशन येथे मर्ग दाखल करण्यात आला असला तरी नेमका मृत्यू कशाने झाला? हा मृत्यू आहे की हत्या हे कोडं अद्याप गुलदस्त्यात आहे.
          लाखांदूर तालुक्यातील विरली बू आणि त्यानंतर aathali येथील खून प्रकरणानंतर आत याच तालुक्यातील विरली/खुर्द येथे एका इसमाच्या संशयित मृत्यू नंतर तालुक्यात विविध चर्चांना उधाण आले आहे. प्राप्त माहितीनुसार, 8 नोव्हेंबर रोजी घटनेतील मृतक हा रात्रभर बाहेर झोपून राहिल्याचे सांगितले जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास सदर इसमाची आई झोपून उठली आणि अंगणात निघाली असता तिला मुलगा मृत पावलेला समजले. ही घटना गावात वाऱ्यासारखी पसरताच घटांस्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. याची माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली. या माहितीवरून लाखांदूर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक सचिन पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष गंद्रे, पोलिस हवालदार प्रमोद टेकाम यांचेसह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनस्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला आणि मृतकाचे शव शवविच्छेदनासाठी लाखांदूर शवागारात पाठविले. 
               या घटनेत लाखांदूर पोलिस स्टेशन येथे मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असला तरी शवविच्छेदनानंतर मृतकाचे शरीराला काही ठिकाणी मार असल्याने हा मृत्यू संशयाच्या चक्रावृहात सापडला आहे. अद्याप postanartam रिपोर्ट यायची आहे. 
               विशेष म्हणजे लाखांदूर तालुक्यात गत पंधरवड्यात ही तिसरी घटना आहे. या घटनेत नेमका मृत्यू कशाने झाला हे कोडं उलघडले नसले तरी postamartam riport आल्यानंतर हे उघड होईलच. मात्र, या आधी याच तालुक्यातील विरली/बूज आणि aathali येथे पंधरवड्यात दोन खून झाल्याच्या घटना घडल्या आहे. यावरून विविध चर्चांना उधाण आले आहे.

0 Response to "एका इसमाचा संशयित मृत्यू..!"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article