कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत युती नको!..
सोमवार, 10 नवंबर 2025
Comment
• पक्ष बैठकीत शरद पवार यांच्या सूचना
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी.
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज निवडणुकीसंदर्भात महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. संस्थांच्या शरद पवार यांनी बैठकीत, पक्षानं भाजप सोबत युती करु नये अशा सूचना दिल्याची माहिती आहे. याशिवाय स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत मूळ ओबीसींना उमेदवारी द्यावी, जर मूळ ओबीसी प्रमाणपत्रधारक उमेदवार मिळाला नाही तर कुणबी प्रमाणपत्र धारक उमेदवाराचा विचार करावा अशा सूचना दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे,
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मूळ ओबीसी उमेदवार असतील त्यांना प्राधान्य द्यावं. मूळ ओबीसी प्रमाणपत्र धारक उमेदवार मिळत नसेल तर त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना उमेदवारी द्यावी, अशा प्रकारच्या सूचना शरद पवार यांनी दिली आहे. ज्या ठिकाणी ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण पडलं आहे, तिथं मूळ ओबीसींना उमेदवारी देण्यात आल्याचीही सुत्रांची माहिती आहे. द्यावी. मूळ ओबीसींना कुठेही दुखवू नका अशा सूचना
चव्हाण सेंटर येथे बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची वाय बी खासदार, आमदार उपस्थित होते. शरद पवारांनी कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जायचं नाही अशा सूचना शरद पवार यांनी दिल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी करण्याचा मार्ग
0 Response to "कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत युती नको!.."
एक टिप्पणी भेजें