पालांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात अत्यावश्यक औषधींचा साठा नाही!
रविवार, 9 नवंबर 2025
Comment
१५ दिवसापासून परिस्थिती बिकट!
रुग्णांना होतो त्रास, शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष..
"साप्ताहिक जनता की आवाज"
वुत्तपत्र प्रतिनिधी
पालादू :- येथील ग्रामीण रुग्णालयात अत्यावशक समजली जाणारी रक्तदाब व मधुमेह नियंत्रित करणाऱ्या औषधीचा गत पंधरा दिवसापासून तुटवडा आहे. जिल्हास्तरावर माहिती कळवून सुद्धा गरजे एवढा औषधीसाठा उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
शासनाने अत्यावशक सेवा सुविधा अंतर्गत सर्वसामान्यांना वाऱ्यावर सोडले आहे. अत्यावश्यक असलेल्या शिक्षण व आरोग्य क्षेत्रात सर्वसामान्य जनतेला अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. महागाईने जनता होरपळून निघत आहे. संपूर्ण भंडारा जिल्ह्यात शिक्षण व आरोग्याची वाताहात सुरू आहे. पालांदूर सारख्या मोठ्या गावात सुद्धा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला दोन शिक्षकावर कारभार निभाव लागत आहे. वर्षभर मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने शिक्षणाची दुरावस्था सहन करावी लागत आहे. शासन विकासाच्या फुकटच्या गप्पा मारून सर्वसामान्य नागरिकांना विकासाचा गाजर दाखवत आहे.
आरोग्य क्षेत्रात सुद्धा कर्मचाऱ्यांचा व औषधीचा तुटवडा सुरू आहे. अधिनस्त अधिकाऱ्यांनी जिल्हास्तरावर मागणी करूनही अपेक्षित औषधीचा साठा उपलब्ध होऊ शकत नसल्याने ग्रामीण जनतेची वाताहात सुरू आहे.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष?
जिल्हास्तरावरील प्रश्नांना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी न्याय देणे अगत्याचे आहे. मात्र लोकप्रतिनिधी स्वतःच्या कर्तव्याला विसरल्याने सामान्य नागरिकांना महागाई व अडचणीचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण रुग्णालयात औषधीचा तुटवडा असल्याने खासगीतून महागडे औषधी खरेदी करून आजारावर नियंत्रण हाच एक उपाय गरीब जनतेच्या डोळ्यापुढे उभा आहे.
१०८ ची समस्या ऐरणीवरच...
अत्यावश्यक वेळेत महाराष्ट्र शासनाच्या वतीने १०८ ची सेवा रुग्णांना वेळेत उपलब्ध केली जाते. मात्र पालांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी १०८ ला नसल्याने सेवा दुर्लभ होत आहे. वरिष्ठ स्तरावरून वेळेत सेवा पुरविण्याची मागणी पालांदूर परिसरातील प्रथम नागरिकांनी केली आहे.
जिल्हाभर हीच समस्या...
औषधीचा तुटवडा जिल्हाभरातील सरकारी दवाखान्यात असल्याची माहिती आहे. पालांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून मिळेल तेवढी औषधी आणून गरजूंना महिना भराएवजी पाच दिवसाचा डोस पूर्वीला जातो. याचाच अर्थ संपूर्ण जिल्हाभर औषधीचा तुटवडा आहे.
गत पंधरा दिवसापासून मी रक्तदाब नियंत्रण औषधीकरिता ग्रामीण रुग्णालयात जात आहे. मात्र मला औषध मिळत नाही. शुक्रवारला सुद्धा जाऊन आलो मात्र औषध उपलब्ध नव्हती. सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.
मुकुंदा खंडाईत रुग्ण पालांदूर
कोट :- औषधीचा तुटवडा आहे. वरिष्ठ स्तरावर मागणी केलेली आहे. परंतु तिथेही साठा अधिक नसल्याने कमी प्रमाणात औषधी मिळते. रुग्णांना पाच दिवसाचा डोज पुरविण्याचा प्रयत्न केला, मात्र रुग्ण नाराज होत असल्याने पूर्ण देण्याचा प्रयत्न आहे. मधुमेह व रक्तदाब नियंत्रित औषधांचा साठा उपलब्ध होताच रुग्णांना महिनाभराचा डोस देण्यात येईल.
वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सतीश गायकवाड
ग्रामीण रुग्णालय पालांदूर.
0 Response to "पालांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात अत्यावश्यक औषधींचा साठा नाही! "
एक टिप्पणी भेजें