संविधान जनजागृतीचा उत्तुंग जागर.
शनिवार, 29 नवंबर 2025
Comment
• जिल्ह्यात ठीक ठिकाणी “संविधान प्रतियोगिता परीक्षा” आयोजित.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
भंडारा :- केंद्रीय मानवाधिकार संगठन, नवी दिल्ली महाराष्ट्र प्रदेश डॉ.देवानंद नंदागवळी यांच्या मार्गदर्शनात “संविधान प्रतियोगिता परीक्षा” आयोजित करण्यात आली आहे, जिल्ह्यातील ठिकठिकाणी शाळा, कॉलेज, महाविद्यालय येथे सविधान प्रतियोगिता परीक्षा राबविण्यात आली आहे, नगरपरिषद कॉलेज पवनी, वैनगंगा महाविद्यालय पवनी, शारदा विद्यालय तुमसर, जिल्हा परिषद शाळा सिहोरा, महिला समाज विद्यालय भंडारा, गांधी विद्यालय कोंढा/कोसरा, भागीरथा भास्कर शाळा भंडारा, नगरपरिषद गांधी विद्यालय भंडारा, नानाजी जोशी महाविद्यालय शहापूर, नेहरू हायस्कूल तुमसर, राष्ट्रीय विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय तुमसर, भारती कन्या विद्यालय तुमसर, नानाजी जोशी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय शहापूर, आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल ठाणा, OASIS इंटरनॅशनल स्कूल बेला, डिफेन्स सर्विसेस ज्युनिअर कॉलेज शहापूर, ऑफिसर्स पब्लिक स्कूल शहापूर, सावित्रीबाई फुले विद्यालय बेला, महाराष्ट्र हायस्कूल सिहोरा, जि. प. हायस्कूल तथा ज्युनिअर कॉलेज सिहोरा, राष्ट्रमाता इंदिरा गांधी ज्युनिअर कॉलेज मोहदुरा
अशा जिल्ह्यातील ठिकठिकाणी ''संविधान प्रतियोगिता परीक्षा सत्र 2025'' उत्साहात सुरू आहे . संविधानाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळून शेकडो विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सुद्धा सहभाग नोंदविला आहे. जिल्हा परीक्षा प्रमुख सोपान रंगारी, परीक्षा प्रमुख प्रविण भोंदे, परीक्षा प्रमुख श्रीकृष्णजी देशभ्रतार, हर्षवर्धन देशभ्रतार यांनी सुयोग्य नियोजन करून संपूर्ण परीक्षा व्यवस्थित पार पाडत आहेत तर परीक्षा स्थळी सोमदेव चोपकर, सौ. दिक्षिका भोंदे, प्रा. प्रदीप घाडगे, प्रा.शुभम चव्हाण, प्रा. अश्विनी गणवीर, प्राचार्य टिचकुले मॅडम, प्राचार्य मारबते सर, प्राचार्य चांदेवार सर, प्राचार्य शीलवंतकुमार रंगारी, प्रा. शुभम तमगिरे, प्रा. अक्षत हेडाऊ, प्रा. हटवार सर, प्रा . राजेश गजभिये, प्रा. मुरकुटे सर, प्रा. दूशांत डोंगरे, कांबळे सर यांनी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, शिस्तबद्ध वातावरण आणि आयोजन समितीचे उत्तम व्यवस्थापन यामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरत आहे. संविधान मूल्यांची जाण आणि जागर यासाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरत आहेत.
महाराष्ट्रात व भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या या उपक्रमामुळे युवकांमध्ये संविधानाबद्दलची आस्था आणि जागरूकता अधिक दृढ होत आहे.
0 Response to "संविधान जनजागृतीचा उत्तुंग जागर."
एक टिप्पणी भेजें