गुरढा येथील शासकीय जागेवरील अतिक्रमण बांधकाम हटवा -- ग्रामावशियाची मागणी.
शनिवार, 29 नवंबर 2025
Comment
. अतिक्रमन केलेली जागा.
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- लाखनी तालुक्यातील गुरढा येथील ग्रामपंचायतीच्या अधिपत्याखालील शासकीय जागेवर सुरू असलेल्या बांधकामाला स्थगीती देवून अतिक्रमण काढण्यात यावा अशी मागणी गुरढा येथील हिरागिर गिरी यांनी तहसिलदार लाखनी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
गुरढा येथील गुरढा-ईसापूर रस्त्यावरील विष्णू गिदमारे नामक व्यक्तीच्या घराच्या बाजूला ग्रामपंचायत व तलाठी अभिलेखात शासकीय जागा आहे. त्या जागेवर
विष्णू गिदमारे यांनी अतिक्रमण करून आपला मालकी हक्क दाखवून शासकीय जागेची परस्पर विक्री करण्याचा प्रयत्न केला. त्या जागेवर बांधकाम करून शासनाची दिशाभूल करून फसवणूक करीत आहेत. त्यांच्या या कृतीमुळे शासनाच्या भविष्यकालीन योजनांना अटसर निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित शासकीय जागेवरील अवैध अतिक्रमण काढून त्यावरील बांधकाम त्वरीत थांबविण्यात यावे, अशी मागणी तक्रारदार हिरागिर गिरी यांनी लाखनी तहसिलदारांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे.
0 Response to "गुरढा येथील शासकीय जागेवरील अतिक्रमण बांधकाम हटवा -- ग्रामावशियाची मागणी."
एक टिप्पणी भेजें