-->
पहेला ग्रामपंचायतीत नवीन व्यापारी संकुलचे लोकार्पण.

पहेला ग्रामपंचायतीत नवीन व्यापारी संकुलचे लोकार्पण.

"साप्ताहिक जनता की आवाज" 
 वृत्तपत्र प्रतिनिधी.

पहेला :- गावाच्या सर्वांगीण विकासाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत पहेला येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ग्रामीण सुविधे अंतर्गत व्यापारी संकुलाचे लोकार्पण आज ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्यास सरपंच मंगला ठवकर, जिल्हा परिषद सदस्य कविता उके,स्थानिक मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. मुख्य मार्गावरील बस स्टॉप समोरी नवीन व्यापारी संकुल सुरू झाल्यामुळे गावातील व्यापाऱ्यांना स्वतंत्र व सोयीस्कर जागा उपलब्ध झाली असून व्यापारवृद्धीस मोठे चालना मिळणार आहे. लोकार्पण प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी गावाच्या प्रगतीत हा उपक्रम नक्कीच महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमात पूजन विधी, नारळ फोडून लोकार्पण, व्यापाऱ्यांना प्रतीकात्मक चाव्या देऊन दुकाने सुपूर्द करणे अशा सोपस्कारांनी वातावरण उत्साहाने भारून गेले होते. ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी या संकुलाच्या उभारणीसाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. या नव्या संकुलामुळे पहेला गावातील व्यावसायिक क्षेत्राला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

0 Response to "पहेला ग्रामपंचायतीत नवीन व्यापारी संकुलचे लोकार्पण."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article