-->
भंडारा जिल्ह्यात संविधान दिन महोत्सव उत्साहात साजरा.

भंडारा जिल्ह्यात संविधान दिन महोत्सव उत्साहात साजरा.

साप्ताहिक "जनता की आवाज"
 वृत्तपत्र प्रतिनिधी.

भंडारा :- भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सव निमित्य भारतीय राज्यघटना व नागरिकांची जबाबदारी या विषयांवर व्याख्यान सभेचे आयोजन संविधान शाखा यशोदा नगर खात रोड,भंडाराच्या वतीनेओबीसी सेवा संघ, जणगणना परिषद  ओबीसी जागृती मंच,ओबीसी क्रांती मोर्चा,युथ फॉर सोसिअल जस्टीस,संविधान बचाव संघर्ष समितीच्या  संयुक्त  विद्यमाने संत तुकाराम महाराज सभागृह, भंडारा (बावणे कुणबी समाज सभागृह भंडारा येथे  दि.26 नोव्हेंबर ला दुपारी 1.00 वा. संविधान दिन साज रा करण्यात आला .  
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी रोशन
 जांभुळकर हे होते तर  प्रमुख पाहुणे म्हणून उमेश कोराम, प्रमुख वक्ते म्हणून डॉ.संजय शेंडे, प्रमुख उपस्थिती चंद्र‌शेखर टेभूर्णे, सदानंद इलमे, डॉ.येडेवार, डॉ.बाळक्रुष्ण सार्वे, गोपाल सेल़ोकर, आदी अतिथी गण प्रामुख्याने उपस्थित होते .
या कार्यक्रमाला शहरातील संविधान प्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.या प्रसंगी डॉ.संजय शेंडे यांनी भारतीय संविधान व नागरिक म्हणून माझी जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हटले की सर्व समाजाच्या नागरिकांच्या हक्काचे संरक्षण करणारे 'संविधान ' हे एकमेव राज्य घटना आहे. ते जर सुरक्षित नसेल तर कोणीही सुरक्षित राहणार नाही.म्हणून संविधानाचा जागर करून संविधान सुरक्षित करून घेणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.
 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णुदास जगनाडे यांनी तर आभार  रमेश शहारे यांनी मानले.या कार्यक्रमाच् यशस्वीतेसाठी करीता 
मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते तसेच सर्व संविधान प्रेमी नी सहकार्य केले.
        
भंडारा जिल्हा ज्येष्ठ नागरिक मंडळ फेस्कॉमच्या वतीने संविधान दिवस साजरा.

 भंडारा :- येथे दिनांक 26 नोव्हेंबरला भारतीय संविधान राष्ट्राला समर्पितसंविधान दिवस साजरा.                      भंडारा जिल्हा ज्येष्ठ नागरिक मंडळ फेस्कॉम भंडारा येथे दिनांक 26 नोव्हेंबरला भारतीय संविधान राष्ट्राला समर्पित करून 75  वर्ष पूर्ण झाले असून संपूर्ण देश अमृत महोत्सव साजरा करीत आहे. याचे औचित्य साधून भंडारा जिल्हा जेष्ठ नागरिकफेसकॉम च्या वतीने   संविधान दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी संविधानाच्या उदद्देशीकेचे वाचन करून त्याप्रमाणे वागण्याची शपथ घेण्यात आली. ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष जाधवराव साठवणे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. तद्नंतर मंडळाचे कार्याध्यक्ष अजाबराव चिचामे, जगन्नाथ गणवीर, सदस्य , गणपत साठवणे यांनी संविधानावर मार्गदर्शन केले. मंडळाचे सल्लागार डॉ.संजय मानकर यांनी संविधानाबाबत विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमाला राकेश मोटघरे, कृष्णा कावळे, श्रीराम वैद्य, एफ. जी.वाडीभस्मे, आकरे  इत्यादी उपस्थित होते.  या कार्यक्रमाचे संचालन सचिव  हिरामण लांजेवार  यांनी केले तर आभार अजाबराव चिचामे यांनी मानले. देशाची राज्यघटना अमलात येऊन सर्व देश समता, स्वातंत्रता आणि बंधुभावाच्या गुणांगोविंदाने नांदत आहेत म्हणून 75  वर्ष पूर्ण झाले असून संपूर्ण देश अमृत महोत्सव साजरा करीत आहे याचे औचित्य साधून संविधान दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी संविधानाच्या उद्देशीकेचे वाचन करून त्याप्रमाणे वागण्याची शपथ घेण्यात आली. ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष जाधवराव साठवणे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. तद्नंतर मंडळाचे कार्याध्यक्ष अजाबराव चिचामे, जगन्नाथ गणवीर, सदस्य , गणपत साठवणे यांनी संविधानावर मार्गदर्शन केले. मंडळाचे सल्लागार डॉ.संजय मानकर यांनी संविधानाबाबत विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमाला राकेश मोटघरे, कृष्णा कावळे, श्रीराम वैद्य, एफ. जी.वाडीभस्मे, आकरे सर इत्यादी उपस्थित होते. संचालन हिरामण लांजेवार सचिव यांनी केले तर आभार अजाबराव चिचामे यांनी मानले.

0 Response to "भंडारा जिल्ह्यात संविधान दिन महोत्सव उत्साहात साजरा."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article