समाजसेवक सुरेश प्रभाकर रेवणकर यांना अखंड भारत सेवा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ...!
रविवार, 30 नवंबर 2025
Comment
सोनू संजीव क्षेत्रे
"साप्ताहिक जनता की आवाज"
मुंबई: - सम्राट अशोक सेवा संस्थान झंझारपूर मधुबनी बिहार येथील देवराज इंद्र पॅलेस येथे कला व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मुंबई घाटकोपर येथील समाज सेवक रक्तदान क्षेत्रात महान कार्य करणारे एकूण 111 वेळा रक्तदान आणि 57 वेळा प्लेटलेट्स दान करणारे , रक्तदान शिबिरात सहभागी होऊन युवक युवतींना प्रेरित करून रक्तदान करण्यास तयार करणारे आणि त्यांना वेळोवेळी रक्तदान करण्यास प्रवृत्त करणारे,तसेच निराधार मुलांना आपल्या निराधार सेवा केंद्र अनाथ आश्रम व बाल वस्तीगृह चे माध्यमातून गरीब गरजूंना अनाथ मुलाना सहारा देऊन त्यांचे पालन पोषण करून , शिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळवून देण्यास मदत करणारे, तसेच मरणोपरांत आपले अंग दान देहदान करणारे सुरेश प्रभाकर रेवणकर यांना अखंड भारत सेवा सन्मान पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. प्रभू राम चंद्राची जन्मभूमी मिथिला सारख्या पावन धरती मध्ये सलग तीन वेळा असे सन्मान मिळणे , आणि ह्या वर्षी विशेष अतिथी मान महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचे भाग्य लाभले, हे माझ्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे. आणि माझे हे सन्मान आपल्या जन्मदाते आई वडील, हिचिंतक, मार्गदर्शक, व त्या त्या क्षेत्रातील सहकाऱ्यांना समर्पित करत आहे असे मत सुरेश रेवणकर यांनी या प्रसंगी व्यक्त केले. या वेळी या कार्यक्रमासाठी उपस्थित संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ललितकुमार शास्त्रीजी, दरभंगा कॅन्सर हॉस्पिटल चे संचालक डॉ.अमरेंद्र नारायण, राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित डॉ.मीनाक्षी कुमारी ह्यांचा हस्ते सन्मानित होणे माजी कार्याचे पोचपावती असे मी मानतो.
आजपर्यंत समाजासाठी केलेले कार्य, दिलेले योगदान लक्षात घेता त्यांना असे शेकडो पुरस्कार स्मृतीचीन्ह देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. त्यानं राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांना सर्व स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत
0 Response to "समाजसेवक सुरेश प्रभाकर रेवणकर यांना अखंड भारत सेवा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ...! "
एक टिप्पणी भेजें