साकोली नगरपरिषद मध्ये बहुचर्चित "शपथपत्र करारनामा" मोहिमेचा झाला समारोप.
रविवार, 30 नवंबर 2025
Comment
• साकोलीत झाल्या ६ नगराध्यक्षा उमेदवारांच्या स्वाक्षऱ्या
नामांकित नागरिक सुद्धा हजर आतापर्यंत ५७ उमेदवारांनी केल्या सह्या.
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- साकोली सेंदूरवाफा शहरातील जागृत मतदार जनता आणि व्हीआयपी ग्रुप साकोली मिडिया व फ्रिडम युथ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेली "शपथपत्र करारनामा" मोहिमेचा रविवारी ३० नोव्हेंबरला समारोप समारंभ संत श्री लहरीबाबा मठ देवस्थान येथे संपन्न झाला. याप्रसंगी सहा नगराध्यक्षा उमेदवारांनी शपथपत्र करारनामा वर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. तर येथे सुद्धा फोनवर, वारंवार मॅसेज देऊनही व चारदा सुचना देऊनही काही नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी गैरहजेरी का लावली.? याबाबत नागरिकांत शंकेची चर्चा सुरू झाली होती.
अख्ख्या महाराष्ट्रात जागोजागी प्रसिद्ध झालेली "शपथपत्र करारनामा" समारोप समारंभात नगराध्यक्षा पदातील उमेदवार भारती मोहन लंजे, वंदना गुलाब पोहाणे, सुनिता अशोक कापगते, वर्षा निताराम तरजूले, देवश्री मनिष कापगते व कोकीळा सचिन रामटेके या सहा महिलांनी येथे येऊन उत्स्फूर्त सहभाग घेतला व जनतेच्या शपथपत्र करारनामा वर स्वाक्षऱ्या केल्यात. या मोहिमेचा ०८ दिवसानंतर साकोलीत रविवारी समारोप समारंभात प्रतिष्ठित नागरिक डॉ. केशव कापगते, प्रा. हरीशचंद्र सोनवाने, इंजि. प्रसन्न गुप्ता, सेवानिवृत्त शिक्षक बी. एम. फुलबांधे यांसह मतदार जनतेतर्फे या मोहीमेचे आयोजक व्हीआयपी ग्रुपचे अध्यक्ष अनिल कापगते, साकोली मिडीयाचे आशिष चेडगे, अंकीत कापगते, मुकेश पंचभाई, पत्रकार मनिषा काशिवार, सुनिल जगिया, मदन कमाने, निलय झोडे, यशवंत कापगते, जनता छगन दोनोडे, गोपिचंद लांडेकर यांसह अनेक मतदार जनता येथे उपस्थित झाले होते. ०८ दिवसांपासून सुरू या मोहिमेत शपथपत्र करारनामा वर एकुण ५७ नगरसेवक नगरसेविका व ०६ नगराध्यक्षा उमेदवारांनी स्वाक्षऱ्या केल्या. काही प्रभागातील नगरसेवक उमेदवारांनी येथे स्वाक्षरी करायला गैरहजेरी दाखविली आणि ते का म्हणून आले नाही.? याबाबत मतदार जनतेमध्ये त्यांच्या विषयी विविध शंकाकुशंकांच्या चर्चा शहरात रंगल्या आहेत.
निवडणुकीत विविध जाहीरनाम्याद्वारे व आश्वासनांद्वारे मतदारांना भुरळ घालण्यास सुरुवात केली जाते. मात्र येथील व्हीआयपी ग्रुप, साकोली मिडिया व फ्रिडम आणि जागृत जनता यांनी प्रथमताच साकोलीतून "मी नगरसेवक नगरसेविका व नगराध्यक्षा झाल्यावर कोणतेही ठेकेदारी, कमिशनखोरी, भ्रष्टाचार करणार नाही, व हा प्रकार जनतेला आढळून आल्यास माझ्यावर गुन्हा दाखल करून मी / आम्ही आमच्या पदाचा राजीनामा देणार" या ५०० रूपयांच्या स्टँम्प पेपरवरील शपथपत्र करारनामा हा उमेदवारांकडून लिहून घेऊन त्यावर स्वाक्षरी मोहीम राबविली गेली. व या मोहिमेला उत्कृष्ट प्रतिसाद सुद्धा मिळला आणि हीच पुनरावृत्ती जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात राबविल्या जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. असा येथील जनतेने अंदाज वर्तविला आहे हे महाराष्ट्राच्या इतिहासातील उल्लेखनीय कामगिरीच म्हणावी लागेल.
0 Response to "साकोली नगरपरिषद मध्ये बहुचर्चित "शपथपत्र करारनामा" मोहिमेचा झाला समारोप."
एक टिप्पणी भेजें