-->
लाखनी पंचायत समिती मधिल शाळा मध्ये प्रमाण पत्राचे वाटप.

लाखनी पंचायत समिती मधिल शाळा मध्ये प्रमाण पत्राचे वाटप.

• शैलेश बहुउद्देशीय सामाजिक संस्था राजनी या संस्थेचा उपक्रम.
 
नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

  लाखनी :- शैलेश बहुउद्देशीय सामाजिक संस्था राजनी या संस्थेच्या माध्यमातून व संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने लाखनी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या काही शाळांमध्ये चित्र कला स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. 
  शाळेतील मुलांना चित्र केलेचे महत्व कळावे, चित्रकलेचे स्वरूप माहिती असावी,व शिक्षण घेत असताना मुलांच्या अंगी काहितरी कलेचे गुण सुध्दा असावी, म्हणून शैलेश बहुउद्देशीय सामाजिक संस्था राजनी या संस्थेने या सत्रामध्ये म्हणजे सन 2025 - 26 च्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांमध्ये चित्र कला स्पर्धा घेण्याचे ठरविले. या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला संस्थेकडून प्रमाण पत्र देऊन उत्कृष्ट स्पर्धक निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या माध्यमातून पारितोषिक देण्याचे सुध्दा संस्थेने आयोजित केले आहे. 
घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा परीक्षा मध्ये आता पर्यंत लाखनी पंचायत समिती मधिल सात शाळांमध्ये चित्र कला स्पर्धा परीक्षा घेण्यात आली असून या विद्यार्थ्यांना संस्थेच्या माध्यमातून स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे.तर उत्कृष्ट स्पर्धक म्हणून निवड झालेल्या स्पर्धक विद्यार्थ्यांना लवकरच पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार असल्याचे संस्थेच्या सचिवांनी सांगितले आहे.तर या शाळेतील शिक्षकांनी सहकार्य केल्याबद्दल त्या सर्व शिक्षकांचे संस्थेकडून हार्दिक अभिनंदन संस्थेचे सचिव यांनी केले आहे.

0 Response to "लाखनी पंचायत समिती मधिल शाळा मध्ये प्रमाण पत्राचे वाटप."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article