-->
अनिल पुडके यांच्या सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचा उत्साहपूर्ण कार्यक्रम संपन्न.

अनिल पुडके यांच्या सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचा उत्साहपूर्ण कार्यक्रम संपन्न.


"साप्ताहिक जनता की आवाज" 
वृत्त प्रतिनिधी.
 
लाखनी :- समर्थ विद्यालय तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक अनिल पुडके यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनीचे संस्थाध्यक्ष आल्हाद लाखनीकर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून शंकरराव बुरडे, अभय भदाडे, अनिल बडवाईक उपस्थित होते. व्यासपीठावर सत्कारमूर्ती अनिल पुडके यांच्यासह सौ. अंजू पुडके आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी राष्ट्रीय शिक्षण संस्था व समर्थ विद्यालय यांच्या वतीने अनिल पुडके यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. अनिल पुडके यांनी सलग ३९ वर्षे राष्ट्रीय शिक्षण संस्थेत अध्यापन करून संस्थेच्या प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या घडणीत मोलाचे योगदान दिले आहे. समर्थ विद्यालयाच्या उभारणीत आणि शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीत त्यांचा सहभाग उल्लेखनीय राहिला आहे.

कार्यक्रमात योगेश्वर बुरडे, नितीन कारवट, दामोदर वंजारी, अनिता मेश्राम, अमृता पुडके, अमित पुडके, दत्ता पुडके यांनी मनोगत व्यक्त केली.
भास्कर पिंपळे व प्रदीप लिचडे यांनी सेवानिवृत्तीपर गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाचे संचालन अक्षय मासुरकर यांनी केले. प्रास्ताविक अभय भदाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन गायत्री भुसारी यांनी मानले. दीर्घ सेवेनंतर अनिल पुडके यांच्या कार्याचा गौरव करून सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी व सहकारी यांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

0 Response to "अनिल पुडके यांच्या सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचा उत्साहपूर्ण कार्यक्रम संपन्न."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article